27 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणउद्धव ठाकरे म्हणतात, लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या...

उद्धव ठाकरे म्हणतात, लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या…

Google News Follow

Related

पाच राज्यांच्या निवडणुका झाल्या दम असेल तर पहिल्यांदा मुंबई महानगरपालिकेची निवडणूक घ्या आणि एकच निवडणूक बॅलेट पेपरवर घ्या, असं आव्हान ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरेंनी दिले आहे. तुमच्यात आत्मविश्वास असेल तर लोकसभा निवडणूक बॅलेट पेपरवर घेऊन दाखवा असे देखील ते या वेळी म्हणाले. मंगळवार, ५ डिसेंबर रोजी उद्धव ठाकरेंनी पत्रकार परिषद घेतली यावेळी त्यांनी असे वक्तव्य केले.

दरम्यान, सरकारला आणि उद्योगपती अदानी यांना जाब विचारण्यासाठी १६ डिसेंबर रोजी धारावीहून अदानींच्या कार्यालायवर शिवसेनेचा मोर्चा काढण्यात येणार असल्याची माहिती उद्धव ठाकरेंनी यावेळी बोलताना दिली आहे.

“मुंबईकडे वाकड्या नजरेने पाहाल तर याद राखा, हे सांगण्यासाठी आम्ही अदानीच्या कार्यालयावर मोर्चा काढणार आहोत. मुंबईकरांना अमाप वीज येत आहे. अदानीकडेच वीज कंपनी आहे. या सर्वांचा सोक्षमोक्ष लावण्याची वेळ आली आहे. तुकडा पाडण्याची वेळ आली आहे. आम्ही विकासाच्या आड नाही. आम्ही आड असतो तर आम्ही विकासाची कामे सुरू केली नसती. महापालिकेत आमची सत्ता होती, आम्ही लोकांचा विकास करू,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

“धारावीकरांचं पुनर्वसन जिथल्या तिथे झालं पाहिजे. प्रकल्प करताना सूचना आणि हरकती जनतेकडून घेतल्या जातात. सरकार म्हणते आम्ही हमी देऊ. पण तुम्ही सूचना आणि हरकती घेतल्याच नाही तर हमी कसली घेणार आहे. तसं नाही झालं तर आम्ही आमची रस्त्यावरची ताकद दाखवू,” असंही उद्धव ठाकरे यावेळी म्हणाले.

 

हे ही वाचा:

शार्कने घेतला महिलेच्या पायाचा घास; पाच वर्षांच्या मुलीसमोर मातेचा मृत्यू!

अमली पदार्थ विरोधी पथकाकडून वर्षभरात ४८ कोटींचा अमली पदार्थ जप्त

द. आफ्रिकेच्या संघाची घोषणा; टेंबा बावुमाला कर्णधारपदावरून हटवले

नौदल अधिकाऱ्यांच्या सन्मानचिन्हांत आता शिवाजी महाराजांचे प्रतिबिंब

उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यावरही टीका केली आहे. शिंदे सरकारच्या शासन आपल्या दारी या कार्यक्रमावर उद्धव ठाकरे यांनी टीका केली आहे. “शेतकऱ्यांची अवस्था वाईट आहे. पीक विमा घोटाळा वेगळा विषय आहे त्यावरही बोलणार आहे. महाविकास आघाडीचं सरकार असताना एक अधिवेशन झालं होतं. त्याच अधिवेशनात मी मुख्यमंत्री म्हणून शेतकऱ्यांचं दोन लाखाचं कर्ज माफ केलं होतं. त्यामुळे शेतकरी तारला होता. कोरोनाच्या काळात शेतकऱ्यांनी आपली अर्थव्यवस्था तारली होती. थोतांडं नाटकं बंद करा. कर्जमुक्ती करा. घोषणा करून भुलभुलैय्या करू नका,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा