उद्धव ठाकरे यांनी मुंबईतील शिवाजी नाट्यमंदिरात ठाकरे गटाच्या शाखाप्रमुखांना मार्गदर्शन केलं. यावेळी सत्ताधारी पक्षांवर टीका करताना उद्धव ठाकरे यांनी शाखाप्रमुखांसमोर पुन्हा टोमणे अस्त्र वापरल्याचे दिसून आले. उद्धव ठाकरे म्हणाले की, “कोविड काळातील भ्रष्टाचार काढत आहेत. पण त्याचवेळी देशभरातील सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांचे नाव सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून आले. भाजपाच्या एकाही मुख्यमंत्र्याचे नाव सर्वोत्तम मुख्यमंत्री म्हणून न आल्याने त्यांची पोटदुखी आहे. सूरज चव्हाण यांच्यावर धाड टाकली, सूरज साधा शिवसैनिक आहे. यांच्या मनात भीती बसली आहे,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.
पाटण्यातील विरोधकांची बैठक ही कुटुंब बचाओ मोहीम होती, अशी टीका उपमुख्यमंत्री देवेंद्र फडवणीस यांनी केली होती. त्यावर उद्धव ठाकरेंनी प्रतिक्रिया देताना म्हटले की, “एवढ्या पातळीवर येऊ नका, परिवार तुम्हाला सुद्धा आहे. आम्ही त्यावर बोललेलो नाही. जर आम्ही बोललो तर तुम्हाला शवासन करावं लागेल. त्यामुळे परिवारावर बोलू नका, कारण मी माझ्या परिवाराबाबत संवेदनशील आहे. तुमच्या परिवाराचे सुद्धा व्हॉट्सॅप चॅट बाहेर येत आहेत, आलेले आहेत. आम्ही त्यावर बोललेलो नाही.”
हे ही वाचा:
जामिनासाठी रचला बनाव; पत्नीला मेंदूचा आजार पण दाखविली हाडाची शस्त्रक्रिया!
अमेरिकेच्या यशस्वी दौऱ्यावरून पंतप्रधान मोदी इजिप्तला रवाना
सगळ्या विमान कंपन्यांना हवेत गुणवत्तावान वैमानिक; वाढणार घसघशीत पगार
राष्ट्राध्यक्ष बायडन यांच्याकडून मोदींना खास ‘शर्ट’ भेट
उद्धव ठाकरे म्हणाले की, “मी मुद्दाम मेहबुबा मुफ्ती यांच्या बाजूला जाऊन बसलो. देवेंद्र हे बेंबीच्या देठापासून बोंबलत होते. तुम्ही जेव्हा त्यांच्यासोबत बसलात तेव्हा तुमचं हिंदुत्व सुटलं होत का? मग आमचं हिंदुत्व कसं सुटलं? माझं त्यांच्याशी बोलणं झालं की तुम्ही निर्लज्ज लोकांसोबत कसे गेलात? उमर अब्दुला यांच्याशी सुद्धा माझं बोलणं झालं. तुमच्या नेत्यांनी केलं ते आम्ही केलं तर आम्ही गुन्हेगार ठरतो. मी जर गुन्हा केला असेल तर तुमचे नेते गुन्हेगार आहेत हे बोला. अगदी मोदी आणि अमित शाह यांनी देखील गुन्हा केला आहे. मग उद्धव ठाकरे गुन्हेगार आहेत.” अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली.