उद्धव ठाकरे यांना स्पीड पोस्टने निमंत्रण मिळाले!

संजय राऊत म्हणतात शाप लागेल

उद्धव ठाकरे यांना प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण मिळाले आहे. या सोहळ्याला दोन दिवस राहिलेले असताना हे आमंत्रण मिळाले आहे. स्पीड पोस्टने हे निमंत्रण पाठवण्यात आले आहे.

ठाकरे यांच्याकडून हे स्पष्ट करण्यात आले आहे की हे निमंत्रण आम्हाला १-२ दिवसांपूर्वी मिळाले पण आमचा नाशिक दौऱ्याचा कार्यक्रम आधीच ठरला आहे.

उद्धव ठाकरे हे २२ जानेवारीला नाशिकला काळा राम मंदिरात दर्शन घेणार आहेत शिवाय गोदावरी किनारी आरतीही करतील. २३ जानेवारीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या जयंतीदिनी उद्धव ठाकरे हे नाशिकमध्ये सभा घेणार आहेत. शिवाय भगूर येथे स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जन्मस्थानालाही ते भेट देणार आहेत.
गेल्या आठवड्यात उद्धव ठाकरे यांनी काळाराम मंदिरातील दर्शनासाठी राष्ट्रपती द्रौपदी मुर्मू यांनाही आमंत्रित केले आहे.

हे ही वाचा:

घुसखोरी रोखण्यासाठी म्यानमारच्या सीमेवर कुंपण घालणार

नटली, सजली अयोध्या नगरी

नाना, मग सोनियांना पाठवा ना, प्राणप्रतिष्ठा सोहळ्याला

‘मै अटल हू’ हा चित्रपट तरुण पिढीला प्रेरणा देणारा

संजय राऊत म्हणाले, तुम्हाला शाप लागेल!

यासंदर्भात ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांनी संतप्त प्रतिक्रिया व्यक्त केली आहे. ते म्हणाले की, सगळ्या मान्यवरांना निमंत्रण पाठवण्यात आले पण त्यांचे रामजन्मभूमी आंदोलनात कोणतेही योगदान नाही. ठाकरे कुटूंबाचे या आंदोलनात मोठे योगदान आहे पण त्यांना शेवटच्या क्षणी निमंत्रण दिले आहे. प्रभू श्रीराम आपल्याला माफ करणार नाही. ते शाप देतील.

याआधी उद्धव ठाकरे यांनी आपल्याला निमंत्रण मिळाले नसले तरी आपल्याला त्याची आवश्यकता नाही. नंतरही आपण राममंदिराला भेट देऊ शकतो. याआधीही आपण अयोध्येला गेलेलो आहोत, असे म्हटले होते.

Exit mobile version