शिवसेनेसाठी १० वेळा तुरुंगात जायला तयार

संजय राऊत यांनी पत्रकारांशी साधला संवाद

शिवसेनेसाठी १० वेळा तुरुंगात जायला तयार

मी तुरुंगात गेलो त्यावेळी उद्धव ठाकरे, माझ्या कुटुंबाची काळजी घेतील याच आला खात्री होती. या खात्रीच्याच बळावर मी तुरुंगात गेलो. जेलमध्ये राहिलो पण पक्षाशी बेईमानी केली नाही, असे वक्तव्य खासदार संजय राऊत यांनी केलं. पत्राचाळ प्रकरणी बुधवारी न्यायालयाने संजय राऊत यांची जामिनावर सुटका केली . त्यानंतर त्यांनी पत्रकार परिषदेत संवाद साधला. शिवसेनेसाठी मी १० वेळा तुरुंगात जायला तयार आहे असेही ते यावेळी म्हणाले. माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे देखील यावेळी उपस्थित होते.

राज्यघटना गोठवण्याचा प्रयत्न होत असल्याचा आरोप करून खासदार राऊत म्हणाले की गेल्या ४० वर्षात मला पक्षाने भरभरून दिले आहे. जेलमध्ये राहूनही मी पक्षाशी बेईमानी केलेली नाही असेही ते म्हणाले. मी दोन दिवस आराम करून पक्षाच्या कामाला सुरुवात करणार आहे. दौरेही करणार आहे. सामनाचे काम करणार असल्याचा मनोदयही त्यांनी यावेळी बोलून दाखवला. राज्य फडणवीस चालवतात बाकीचे गुंडाळतात अशी टीका करून राऊत यांनी फडणवीस यांनी राजकारणातील कटुता जायला पाहिजे या वक्तव्याचे स्वागत केले.

हे ही वाचा:

अफझलखानाच्या मृत्यूदिनीच त्याच्या कबरीभोवतालच्या अनधिकृत बांधकामावर हातोडा

अडवाणी, जोशी आणि उमा भारती यांच्या निर्दोष मुक्ततेविरोधातील याचिका फेटाळली

आयटम गर्ल राखी सावंत सह दोघीविरुद्ध विनयभंगाचा गुन्हा दाखल

फेसबुक, इंस्टाग्राम, व्हॉट्सऐपमध्येही आता नोकर कपात

ईडी बंद का करू नये

संजय राऊत जेलमधून बाहेर आल्याचा आनंद आहे. राऊतांच्या धाडसाचे कौतुक केले पाहिजे. मित्र तोच जो संकटात सोबत लढतो. संजय राऊत संकट काळात माझ्यासोबत लढतायेत. न्यायदेवतेचे आभार मानतो. न्यायालायने निकालपत्रात परखड निरीक्षणे नोंदवली आहेत अशा शब्दात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या. तपास यंत्रणा पाळीव प्राण्याप्रमाणे वागत आहेत. न्यायालय आपल्या बुडाखाली घेण्याचा कोणी प्रयत्न करत असेल तर त्याला विरोध केला पाहिजे असा आरोप करून ठाकरे यांनी ईडी बंद का करू नये असा सवाल उपस्थित केला.

कालच्या निकालाने न्यायालायने केंद्र सरकारला दणका दिला आहे. आतापर्यंत केंद्रीय यंत्रणांचा दुरुपयोग करून पक्ष फोडले गेले आणि जात आहेत. केंद्रीय यंत्रणेद्वारे बनावट अटक केली जाते अशी टीका ठाकरे यांनी यावेळी केली.

Exit mobile version