24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारण'उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा गेम केला'

‘उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा गेम केला’

बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांचा आरोप

Google News Follow

Related

उद्धव ठाकरे यांनी राज ठाकरे यांचा गेम केला असा गंभीर आरोप बुलढाण्याचे आमदार संजय गायकवाड यांनी केला आहे.  बुलढाण्यातील  छत्रपती शिवाजी महाराज मंदिर भूमिपूजन समारंभात आमदार गायकवाड यांनी हा खळबळजक आरोप केला आहे

बाळासाहेबांवर  बायपास झाली  त्यावेळी ते एकाकी पडले होते. त्यामुळे राज्याचे नेतृत्व आपण करावं असं त्यांना वाटलं करावं. त्यावेळी सर्वात मोठी अडचण राज ठाकरेंची होती. उद्धव ठाकरे यांना कार्याध्यक्ष करा. असे राज ठाकरे यांना सांगायला सांगा, अशी इच्छा बाळासाहेबांची आहे असे उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशींच्या कानात सांगितले असा गौप्यस्फोटही गायकवाड यांनी यावेळी केला.  कारण निवडणूक आयोगाला कार्याध्यक्ष निवडून द्यायचा होता असेही ते म्हणाले

राज ठाकरे बाळासाहेबांना क्रॉस करू शकत नाही. त्यामुळे काहीही संबंध नसताना राज ठाकरे यांनी उद्धव ठाकरे यांचे नाव कार्याध्यक्ष पदासाठी सुचवले. उद्धव ठाकरे यांनी मनोहर जोशींच्या खांद्यावर बंदूक ठेवली. उद्धव ठाकरे आणि शिवसेना यांचा काहीही संबंध नव्हता. संबंध होता तो राज ठाकरे यांचा असा टोलाही गायकवाड यांनी यावेळी लगावला.

निवडणूक आयोगाने शिवसेना नाव आणि शिवसेनेचे निवडणूक चिन्ह धनुष्यबाण गोठवले. हे त्यांच्याच चुकीचा परिणाम आहे. आता ‘त्यांना’ या घोडचुकीचे परिणाम भोगावेच लागतील, अशी बेधडक प्रतिक्रिया शिंदे गटाचे आक्रमक आमदार संजय गायकवाड यांनी दिली. त्यांनी नाव न घेता पक्षप्रमुख उद्धव ठाकरे व वरिष्ठ नेत्यांना टोले लगावले. शिवसेनेला आई म्हणता अन् काँग्रेस-राष्ट्रवादीच्या दावणीला बांधता, हे कितपत योग्य आहे? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.

हे ही वाचा:

शिंदे फडणवीस सरकारने दिली शेतकऱ्यांना दिवाळी भेट

कोळसा खाणीत झालेल्या स्फोटात २२ जणांचा मृत्यू

INS अरिहंतवरून बॅलेस्टिक क्षेपणास्त्राची यशस्वी चाचणी

धक्कादायक!! पाकिस्तानमध्ये रुग्णालयात आढळले ५०० मृतदेह

शिवसेनेचे धनुष्यबाण चिन्ह गोठवले त्यावेळीही आमदार गायकवाड यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली होती. धनुष्यबाण गोठवले हे त्यांच्याच चुकीचा परिणाम आहे. आता ‘त्यांना’ या घोडचुकीचे परिणाम भोगावेच लागतील अशी टीका त्यांनी केली होती. आमच्यासह ४० आमदारांनी बंड केले. त्यांची मनधरणी केली असती, चर्चा केली असती तर आज ही वेळ आली नसती. आमदार, खासदार गेले अन् आता घराण्यातील सून, मुलगा, विश्वासू सेवक थापादेखील शिंदे गटात आला अशी टीकाही त्यांनी केली होती.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा