28 C
Mumbai
Saturday, November 23, 2024
घरराजकारणसुप्रिया सुळेंना मदत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली

सुप्रिया सुळेंना मदत करण्यासाठी उद्धव ठाकरेंनी कंबर कसली

बारामती मतदार संघाच्या आढाव्यानंतर घेतला निर्णय

Google News Follow

Related

शिवसेनेत वर्षभरापूर्वी फूट पडल्यानंतर आणि आता राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये अजित पवार यांनी बाहेरचा रस्ता धरल्यानंतर दोन्ही पक्षांकडून एकमेकांना आधार देण्याचे काम सुरू झाले आहे. उद्धव ठाकरे हे सध्या लोकसभा, विधानसभा निवडणुकीच्या तयारीला लागले आहेत. त्यांनी विविध भागात जाऊन आपल्या कार्यकर्त्यांशी चर्चा सुरू केली आहे. त्यात बारामतीत सुप्रिया सुळे यांना निवडून आणण्यासाठी आपल्या कार्यकर्त्यांना आदेश दिले आहेत.

 

राष्ट्रवादी काँग्रेसमध्ये झालेल्या फुटीनंतर बारामती लोकसभा मतदारसंघाच्या स्थिती संदर्भात उद्धव ठाकरेंनी स्थानिक नेते आणि पदाधिकाऱ्यांकडून आढावा बैठकीत माहिती घेतली. शिवाय, आपल्याला याठिकाणी विधानसभेत काय संधी आहेत, याचाही आढावा त्यांनी घेतला. त्यासाठी त्यांनी बारामतीत इतकी वर्षे एकहाती सत्ता असलेल्या पवारांना जिंकून आणण्याचे आवाहन आपल्या कार्यकर्त्यांना केले.

 

आपण ‘इंडिया’ आघाडीमध्ये असल्यामुळे बारामतीत सुप्रिया सुळे यांना आपल्या पक्षाकडून ताकद द्या, त्यांना समर्थन द्या, अशा सूचना उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्ते आणि नेत्यांना दिल्या आहेत. शरद पवारांच्या काळापासून बारामती हा पवारांचाच बालेकिल्ला राहिलेला आहे. या जिल्ह्यात पवारांशिवाय कुणी निवडून येणे कुणालाही शक्य झालेले नाही. स्वतः शरद पवार, अजित पवार, सुप्रिया सुळे असे सगळेच नेते बारामतीतून निवडून आलेले आहेत. पवारांच्या राजकारणाचा तो केंद्रबिंदू राहिलेला आहे. त्यामुळे अशा परिस्थितीतही सुप्रिया सुळे यांना जिंकून आणण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांना आवाहन केल्यामुळे आश्चर्य व्यक्त होत आहे.

 

 

बारामती लोकसभा मतदारसंघात ठाकरे गटाची ताकद किती, यासंदर्भात विधानसभा निहायसुद्धा उद्धव ठाकरे यांनी आढावा घेतला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी बारामती लोकसभा मतदारसंघात आपण कोणत्या विधानसभा जागेसाठी विचार करू शकतो, या संदर्भातही आढावा घेण्यात आला आहे.

हे ही वाचा:

आरोग्य आणीबाणीसाठी सुसज्ज राहायला हवे

राहुल गांधी नव्या वास्तूच्या शोधात

हिमाचल मधील ११ हजार घरांचे नुकसान; राष्ट्रीय आपत्ती घोषित करण्याची मागणी !

आशिया चषकासाठी भारतीय क्रिकेट संघाची निवड २१ ऑगस्टला!

 

खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी ठाकरे गट तयारी करत आहे. तर त्या बदल्यात बारामतीमध्ये आपण सुप्रिया सुळे यांना मदत करून असा फॉर्म्युला विचाराधीन आहे. खडकवासल्याची जागा ठाकरे गटाला मिळावी अशी स्थानिक नेते, कार्यकर्त्यांची इच्छा आहे आणि ती आजच्या बैठकीत व्यक्त केली गेली. या लोकसभा मतदारसंघात आपण इतर विधानसभा मतदारसंघांमध्ये राष्ट्रवादी काँग्रेसला ताकद देणार आहोत, असे आश्वासनही देण्यात आले आहे. तर खडकवासला विधानसभा मतदारसंघासाठी आपण प्रयत्न करायला हवा, असे नेत्यांचे म्हणणे आहे.

 

सध्या या दोन्ही पक्षात फूट पडल्यामुळे आगामी निवडणुकीत एकमेकांना आधार देण्याची आवश्यकता असल्याचे या पक्षाच्या नेते आणि कार्यकर्त्यांत भावना आहे. याच मतदारसंघात आता एकटे अजित पवार नसतील तर त्यांच्या साथीला भाजपा आणि एकनाथ शिंदे यांचेही कार्यकर्ते सोबतीला असणार आहेत, त्यामुळे उद्धव ठाकरेंनी सुप्रिया सुळेंच्या मदतीला धावून जाण्याचे ठरविले असावे, अशी चर्चा आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
194,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा