महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांना इतके दिवस विस्मृतीत गेलेल्या हिंदुत्वाची आठवण पुन्हा एकदा आली. शिवसेनेच्या दसरा मेळाव्याच्या निमित्ताने भाषण करताना त्यांनी पुन्हा एकदा हिंदुत्वाच्या नावाने दंड थोपटून भाषण केले. पण या भाषणात उद्धव ठाकरेंनी केलेल्या दाव्यांवरून त्यांच्यावर चांगलीच टीका होताना दिसत आहे. युगानुयुगे चालत आलेल्या ‘हिंदुत्व’ या विचारधारेची १९६६ साली स्थापन झालेला आणि महाराष्ट्रापुरता मर्यादित असलेल्या शिवसेना हा एकच पक्ष कैवारी असल्या सारखे दावे उद्धव ठाकरे यांनी केले. त्यामुळेच उद्धव ठाकरे यांच्या भाषणावर निरनिराळे सवाल उपस्थित होताना दिसत आहेत.
आज मुंबईतील षण्मुखानंद सभागृहात शिवसेनेचा दसरा मेळावा पार पडला. या मेळाव्याच्या निमित्ताने हातातील सरकारचा वापर करत अचानकपणे कोरोना नियम शिथिल करत सभागृहातील कार्यक्रमांना असेलली उपस्थितीची मर्यादा वाढवण्यात आली. त्यामुळे आधीच या मेलवयवर टीकेची झोड उठली होती. त्यात उद्धव ठाकरे यांच्या भाषणांमधील अजब दाव्यांमुळे यात आणखीन वाढ होण्याची शक्यता आहे.
दसऱ्या मेळाव्याच्या भाषणात सुरवातीपासूनच उद्धव ठाकरे हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून संघ आणि भाजपावर टीका करताना दिसले. पण दुसरीकडे दिवसाढवळ्या बंगालमधील हिंदूंवर अत्याचार ज्यांच्या कार्यकर्त्यांनी केले त्या ममता बॅनर्जी यांचे मात्र उद्धव ठाकरेंनी तोंडभरून कौतुक केले. तर महाराष्ट्रही बंगालच्या वाटेने गेला पाहिजे असे धक्कादायक विधानही त्यांनी केले.उद्धव ठाकरे यांनी आपल्या पक्षातील भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या नेत्यांनाही पाठीशी घालण्याचा प्रयत्न केला आहे. कालपर्यंत जो तुमचा सहकारी होता ती शिवसेना तुम्हाला मदत करत नाही म्हणून शिवसैनिक भ्रष्टाचारी झाला का? असे त्यांनी म्हटले आहे. त्यामुळे भ्रष्टाचाराचे आरोप झालेल्या अनिल परब, प्रताप सरनाईक, भावना गवळी यांच्या बचावासाठी उद्धव ठाकरे मैदानात उतरल्याची चर्चा रंगू लागली आहे.
हे ही वाचा:
‘घोटाळेबाज सरकारला घालविण्यासाठी अंदमान निकोबार जेलमध्येही जाईन!
उद्धव ठाकरे म्हणजे लायसन्स नसलेले ड्रायव्हर, शिवसेनेचाच नेता असे का म्हणाला?
घाटकोपर उड्डाणपुलाचे नियम गेले उडत; दुचाकीस्वारांचा मुजोरपणा
अरेरे! दसऱ्याच्या पुजेसाठी फुले आणायला गेलेले उपसरपंच अपघातात मृत्युमुखी
तर वसुलीबाजीच्या घटनांमुळे बदनाम झालेल्या महाराष्ट्राच्या गृहखात्याला आणि पोलीसांच्या विरोधात कारस्थान सुरु आहे असे उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यातील हुतात्मा झालेल्या पोलिस अधिकाऱ्यांचे नाव घेत भावनिक आवाहन उद्धव ठाकरे यांनी केले. त्यामुळे सचिन वझे, परमबीर सिंह यांच्यासारख्या अधिकाऱ्यांमुळे पुढे आलेल्या राज्यातील गृहखात्याचा कारभार भवनात चादर पांघरून झाकायचा प्रयत्न मुख्यमंत्री करतायत का? असा सवाल विचारला जात आहे.
महाराष्ट्रात सुरु असलेली आमली पदार्थ विरोधी मोहीम आणि एनसीबीच्या कारवाईच्या अनुषंगाने बोलताना हा देखील महाराष्ट्राला बदनाम करण्याचा डाव असल्याचे मुख्यमंत्री म्हणाले. यावेळी पुन्हा एकदा त्यांनी गुजरातकडे बोट दाखवत टोलवाटोलवी करण्याचा प्रयत्न केला. पण दसरा मेळाव्यात भाषण करताना उद्धव ठाकरे यांना स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे ही गोष्ट नीट लक्षात होती हीच काय ती समाधानाची बाब.