24 C
Mumbai
Monday, December 23, 2024
घरराजकारणउद्धव ठाकरे आता समाजवाद्यांच्या पंगतीत

उद्धव ठाकरे आता समाजवाद्यांच्या पंगतीत

मेळाव्यातून शोधला नवा आधार

Google News Follow

Related

एकनाथ शिंदे यांनी काही आमदारांसह वेगळी वाट निवडल्यानंतर उद्धव ठाकरे नवनव्या आधारांच्या शोधात आहेत. आता ते समाजवादी जनता परिवाराच्या पंगतीत बसले आहेत. रविवारी यासंदर्भातील कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा जुनीच व्यथा मांडली आणि आता समाजवादी परिवारासोबत आपण का येत आहोत, याचे कारण सांगितले.

उद्धव ठाकरे यांचे यावेळी पागोटे आणि घोंगडे देऊन समाजवादी परिवारात स्वागत करण्यात आले.

त्यावेळी उद्धव ठाकरे म्हणाले की, आमची विविध पक्षांशी विचारांची लढाई होती. व्यक्तींशी लढाई नव्हती. तारा रेड्डी, अहिल्याताई, मृणालताई आपण त्यांना पाणीवाली बाई म्हणालो होतो. आपले विचार वेगळे होते पण उद्देश एक आहे. आम्ही आता उडी मारली आहे. प्रवाहाच्या विरोधात पोहण्यासाठी उडी मारली. प्रवाहाला ताकद असेल तर आम्हाला थांबवून दाखवावे, या जिद्दीने उतरलो आहोत.

 

उद्धव ठाकरेंनी सांगितले की, आता टर्निंग पॉइंट आलेला आहे जायचे कुठे याचा विचार सुरू आहे. शेवटी नेते आपले काय करायचे ते करतात शिवसेनेत सुद्धा मी पक्षप्रमुख आहे. पण महत्त्वाचे पद आहे ते गटप्रमुख. त्या थराच्या आधारे हंडी फोडायची आहे. पण ती दह्यासाठी नाही. २५ वर्षांच्या भाजपासोबतच्या युतीचा पुन्हा एकदा उल्लेख करत उद्धव ठाकरे म्हणाले की,  आम्ही २५ वर्षे त्यांच्यासोबत होतो पण वेगळे का झालो. हिंदू मते मिळाली तर जिंकू शकतो असे वाटल्यामुळे ते आमच्यासोबत आले आणि मोठे झाले. त्यामुळे त्यांना आमची गरज नाही. उद्धव ठाकरेंनी आपली हतबलताही यावेळी व्यक्त केली. ते म्हणाले की, तुम्ही माझ्यासोबत आलात. पण तुमचे काही मागणे नाही. माझ्या हातात आता काहीच नाही, मी कुणीच नाही. मी मागितले तर काय देऊ शकतो. अशी मैत्री होते तेव्हा ती चिरकाळ टिकते.

 

गुजरातमधील पाकिस्तानविरुद्धच्या सामन्यात पाक खेळाडूंवर केलेल्या पुष्पवृष्टीवर त्यांनी टीका केली आणि त्याचाही समाजवादी परिवाराच्या बैठकीशी संबंध जोडला. ते म्हणाले की, जर गुजरातमध्ये नरेंद्र मोदी स्टेडियममध्ये भाजपाकडून पाक खेळाडूंवर पुष्पवृष्टी केली जात असेल तर मग मी शिवसेनेचा नेता म्हणून समाजवादी नेत्यांशी का बोलू शकत नाही.

हे ही वाचा:

नीरज चोप्राचे जागतिक ऍथलेटिक्स संघटनेकडून कौतुक!

मुंबईतील ताज हॉटेल बॉम्बने उडवून देण्याचा पोलिसांना फोन!

पॅलेस्टाइनवरून तस्लिमा नसरिन यांनी बांगलादेशवासियांना सुनावले

रोहित शर्माने सांगितले, अंपायरला दंड दाखविण्याचे कारण

 

बाळासाहेबांनी विरोध केला त्यांनाच उद्धव ठाकरे जवळ करत आहेत!

 

यावर महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे म्हणाले की, खेळ आणि राजकारण यांची गल्लत करता कामा नये. बाळासाहेबांनी काँग्रेसला गाडण्याची भाषा केली होती पण यांनी त्याच काँग्रेसला डोक्यावर घेतले. हिंदुत्वाला तिलांजली दिली. मतदारांचा विश्वासघात केला. बाळासाहेबांनी विरोध केला त्यांच्याशी आता हे युती करत आहेत. त्यांना आता हे जवळ करत आहेत. हेच त्यांचे हिंदुत्व आहे. येणाऱ्या निवडणुकीत या महाराष्ट्रातील जनता मोदींनी केलेल्या ९ वर्षातील कामाची आणि गेल्या वर्षभरात केलेल्या कामाची पोचपावती देतील. घरात बसलेल्यांना लोक मतदान करत नाहीतत्यांना मतदान करणार नाहीत. रस्त्यावर उतरून काम करणाऱ्यांनाच जनता मतदान करते.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा