30 C
Mumbai
Saturday, December 28, 2024
घरराजकारणबॅनरवरून उद्धव गायब, एकनाथ शिंदेंचा बोलबाला

बॅनरवरून उद्धव गायब, एकनाथ शिंदेंचा बोलबाला

दादर, वरळी, प्रभादेवीमध्ये शिवसेनेचे बदलते चित्र

Google News Follow

Related

गेली दोन वर्षे कोरोनाच्या नावाने हिंदू सणावर महाविकास आघाडीने कडक निर्बंध घातले होते. महाविकास आघाडी सरकार कोसळल्यानंतर भाजपा-शिवसेना सत्तेत येताच हिंदू सणांवरील सर्व निर्बंध उठवून सर्वांना दिलासा दिला. हिंदू सणावरील निर्बंध हटवले याबद्दल भाजपा-शिवसेना सरकारचे आभार मानणारे बॅनर सध्या चर्चेत आहेत. वरळी, प्रभादेवी, दादर या विभागात या बॅनर्सनी सर्वांचे लक्ष वेधून घेतले आहे.

एकेकाळी दादर, प्रभादेवी, वरळी हे शिवसेनेचे गड मानला जात होते. परंतु हे गड आता शिवसेनेच्या हातातूनन निसटून दुसऱ्या शिवसेनेच्या हातात गेले की काय, असेच सध्याचे वातावरण दिसत आहे. दादर, प्रभादेवी, वरळी भागात गणेशोत्सावातील जे वातावरण पाहावयास मिळते आहे, यावरूनच सध्या तरीच हेच चित्र स्पष्ट दिसत आहे.

मुंबई महानगर पालिकेची निवडणूक कोणत्याही क्षणी होण्याची चिन्ह आहेत. शिवसेनेचे मुख्यालय दादरमध्येच आहे. शिवसेना भवन याच ठिकाणाहून शिवसेनेचा कारभार चालत आला आहे. भाजपा-शिवसेना सरकार स्थापन झाल्यानंतर एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. त्यानंतर दादरमध्ये प्रति शिवसेना भवन उभारले जाईल, अशा चर्चांनाही उधाण आले होते.
दहीहंडी दणक्यात साजरी केल्यानंतर मोठ्या उत्साहात गणपती उत्सवही साजरा केला जात आहे. पण यावेळी सार्वजनिक मंडळात भाजपमय वातावरण झाले आहे. बहुतेक मंडळात भाजपाचे बॅनर झळकाताना दिसत आहेत. दादर, वरळी, प्रभादेवी येथील बस स्टॉपवर भाजपाचेच होर्डिंग दिसत आहेत. त्यावर आपले सरकार आले… हिंदू सणांवरचे विघ्न टळले… गणपती बाप्पा मोरया या शब्दांनी सर्वांचे लक्ष वेधून घेत आहे.

हे ही वाचा:

‘या’ गावात फक्त एकच गणपती

शहेनशहा जहाँ बैठते है, दरबार वही लग जाते है

सिनेमांच्या पात्रात श्रीगणेश, मनाला पटते का?

‘केरळमध्ये काम करण्यासाठी देशभक्तीबरोबरच बलिदान आणि शौर्यही हवे’

 

आमदार सदा सरवणकर यांच्या बॅनरमधून उद्धव ठाकरे गायब झालेत. यंदा ही जागा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतली आहे. सदा सरवणकर यांचे पुत्र माजी नगरसेवक समाधान सरवणकर यांच्या बॅनरमधूनही उद्धव ठाकरेंच्या जागी ठाण्याचे शिवसेनेप्रमुख आनंद दिघे यांनी ही जागा घेतली आहे. त्यांच्या वाढदिवसाच्या बॅनरमध्येही तेच चित्र पाहायला मिळतंय.
वरळी विभागातही हेच चित्र दिसत आहे. माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांचा हे मतदार संघ. भारतीय जनता पक्ष आणि मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या गटांनी वरळीमध्ये असलेल्या मार्केटचा राजा येथील विघ्नहर्ता सार्वजनिक गणेशोत्सव मंडळातील परिसरात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांचे बॅनर झळकले आहेत. याच वरळीत जांबोरी मैदानात भारतीय जनता पक्षाने दहीहंडीचे आयोजन दणक्यात करून विरोधी पक्षाला चपराक दिली होती.

ही राजकीय रंगत पुढील काळात आणखी रंगताना दिसेल. मुंबई महानगरपालिकेच्या निवडणुका पुढील काही महिन्यांत होण्याची शक्यता दिसत आहे. गणेशोत्सवातील वातावरण दादर, वरळी, प्रभादेवीत भाजपमय झाले आहे. भाजपाची ही बॅनरबाजी पाहून अनेकांच्या भुवया उंचावल्या आहेत. नवरात्रौत्सवात अशीच परिस्थिती असेल. तेव्हा कुरघोडी कोण कुणावर करते आहे याचे प्रत्यंतर या बॅनरबाजीतून येत आहे. निवडणुकीचे मैदानही जवळ आहे. तिथे कोण वरचढ ठरते हे येणारा काळच ठरवेल.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
217,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा