“अनिल देशमुखांचे सत्य योग्य वेळी बाहेर काढणार”

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचा अनिल देशमुखांना इशारा

“अनिल देशमुखांचे सत्य योग्य वेळी बाहेर काढणार”

देशात लोकसभा निवडणुकीची धामधूम सुरू असताना सत्ताधारी आणि विरोधक यांच्यात आरोप प्रत्यारोपांची शर्यत सुरू असल्याचे चित्र आहे. उद्धव ठाकरे आणि विरोधक सातत्याने भाजपा आणि भाजपा नेत्यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न करत आहेत. याला आता उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी जोरदार प्रत्युत्तर दिले आहे.

अनिल देशमुखांचे सत्य योग्य वेळी बाहेर काढणार

तसेच पोलीस आयुक्त परमबीर सिंह यांनी कथित १०० कोटी रुपयांच्या घोटाळ्याप्रकरणी माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर गंभीर आरोप केले होते. या आरोपांमुळे अनिल देशमुख यांना एकवर्षापेक्षा जास्त काळ तुरुंगात जावे लागले होते. यावर अनिल देशमुख यांनी उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे नाव घेत काही आरोप केले होते. आपल्याला कोणत्या परिस्थितीत जावं लागलं, तसेच देवेंद्र फडणवीस यांनी आपल्याशी समझौता करण्यासाठी माणूस पाठवला होता, असा मोठा दावा त्यांनी केला. यावर उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आपली प्रतिक्रिया दिली आहे.

देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “अनिल देशमुख हे सर्व कल्पित गोष्टी बोलत आहेत. सत्य माझ्याजवळ आहे. योग्य वेळी मी ते बाहेर काढणार. सध्या त्यांना निवडणुकीच्या निमित्ताने सणसणी पसरवायची आहे. मात्र, ज्यावेळेस सत्य बाहेर काढेन त्यावेळी त्यांच्या लक्षात येईल,” असा इशारा देवेंद्र फडणवीस यांनी अनिल देशमुखांना दिला आहे.

उद्धव ठाकरेंवर मानसिक परिणाम झालाय

नकली शिवसेना या मुद्द्यावरून सध्या विरोधक आणि सत्ताधारी यांच्यामध्ये शाब्दिक युद्ध पेटले आहे. देवेंद्र फडणवीस टीका करताना म्हणाले की, “नरेंद्र मोदी हे बाळासाहेब ठाकरे यांचा अपमान करू शकत नाहीत. त्यांनी वारंवार सांगितलं आहे की, हिंदुहृदयसम्राट शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे हे आमच्याकरता आदर्शच आहेत. पण आत्ताची स्थिती अशी आहे की उद्धव ठाकरेंचा तोल गेला आहे. त्यांच्यावर मानसिक परिणाम झालेला आहे. त्यांना मानसोपचार तज्ज्ञांची आवश्यकता आहे. मला असं वाटतं की तात्काळ त्यांना मानसोपचार तज्ञांकडे नेलं पाहिजे,” असा खोचक टोला देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरेंना लगावला आहे.

हे ही वाचा:

पाकला सन्मान द्या, नाहीतर अणुबॉम्ब फोडतील! मणिशंकर अय्यर यांनी दिला फुलटॉस

बडतर्फ केलेल्या सर्व केबिन क्रूला पुन्हा घेतले एअर इंडियाच्या ‘विमाना’त

‘तुम्ही भारतीय आहात म्हणून तुम्हाला मत दिले नसते’

‘या’ पाच कारणांमुळे सेन्सेक्स गडगडला

छगन भुजबळ पूर्ण ताकदीने महायुतीच्या पाठीशी

आमदार सुहास कांदे यांनी मंत्री छगन भुजबळ हे तुतारीचा प्रचार करत असल्याचा आरोप केला होता. यावर देवेंद्र फडणवीस म्हणाले की, “छगन भुजबळ हे कधीच दुसऱ्या कोणाचा प्रचार करणार नाहीत. भुजबळ पूर्ण ताकदीने आणि शक्तीने महायुतीच्या पाठीशी आहेत. ते महायुतीचाच प्रचार करतील. अर्थात भुजबळ आणि सुहास कांदे यांच्यात काही वाद असल्याचं आम्ही दूर करू,” असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

Exit mobile version