‘अपयशी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव’

‘अपयशी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव’

शनिवार, १४ मे रोजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी जाहीर सभा घेतली होती. त्यांनतर दुसऱ्याच दिवशी विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी सभा घेत शिवसेनवर निशाणा साधला होता. त्यांनतर सोमवार, १६ मे रोजी म्हणजेच, आज भारतीय जनता पार्टीचे नेते नारायण राणे यांनी पत्रकार परिषद घेत थेट सामना वृत्तपत्रातल्या बातम्यांवर घाणाघाती टीका केल्या आहेत.

१४ तारखेला मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी फार मोठा गौरव करून सभा घेतली. जाहिरातबाजी, शक्तिप्रदर्शन करून मुख्यमंत्र्यांना सभा घ्यावी लागली. मात्र या सभेचा खर्च किती आला याचा अंदाज मुख्यमंत्र्यांना आहे का? असा सवाल नारायण राणेंनी केला आहे. नारायण राणे म्हणाले, उद्धव ठाकरेंना महाराष्ट्राचे मुख्यंमंत्री म्हणायला मला लाज वाटते. आतापर्यंत महाराष्ट्रात मुख्यमंत्र्यांच्या इतिहासात प्रत्येक मुख्यमंत्र्याने प्रतिमा वाढवण्याचा प्रयत्न केला, मात्र मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यात अपयशी ठरले आहेत. भाषणातली त्यांची भाषा ऐकून आम्हला लाज वाटल्याची राणे म्हणाले.

पुढे ते म्हणाले, बाळासाहेब ठाकरेंचे हिंदुत्व प्रेम, मराठी माणसाबद्दल जी आस्था होती ती उद्धव ठाकरेंमध्ये नाही. बाळासाहेबांनी कुठल्याही पदाची अपेक्षा न ठेवता नेतृत्व केले. मात्र, उद्धव ठाकरेंनी पदासाठी हिंदुत्व सोडले. जस वचन दिले तसेच १०० टक्के वागणारे फक्त बाळासाहेब ठाकरे होते. तेच उद्धव ठाकरेंना वचन म्हणजे काय हे तरी माहिती आहे का? अशी खोचक टीका नारायण राणेंनी उद्धव ठाकरेंवर केली आहे.

सामना वृत्तपत्रात जी भाषा वापरतात ती सुसंस्कृत भाषा आहे का? ज्या बातम्या ते वृत्तपत्रात देतात त्याचा काय फायदा? याउलट लोकांच्या हिताचे काहीतरी सांगा. केंद्र सरकारने ८८ हजार नोकऱ्या दिल्या अश्या बातम्या का नाही छापत? असा सवाल त्यांनी उपस्थित केला आहे. मुंबई महानगर पालिकेत जो भ्रष्टचार सुरु आहे असा भ्रष्टचार जगाच्या पाठीवर कुठे झाला नसेल. काही न करता शिवसेना पाठ थोपटून घेत आहे. कोरोना काळात १ लाख ६० हजार लोकंचे प्राण गेले. एसटी कर्मचाऱ्यांनी आत्महत्या केल्या, शेतकऱ्यांचे अनेक प्रश्न आहेत याबाबत हे लोक काही बोलत नाहीत. मुख्यमंत्र्यांचे भाषण म्हणजे फक्त खोटारडेपणा, बोगसपणा, अशी गंभीर टीका राणेंनी केली आहे.

पुढे ते म्हणाले, भाजपाच्या नावाने हे मुख्यमंत्री झाले. यशवंत जाधवांच्या घरी एवढे कोटी रुपये सापडले मग मातोश्रीवर किती असतील? असा सवाल राणेंनी केला आहे. पुढे ते म्हणाले, मुन्नाभाई लोचा अशी भाषा मुख्यमंत्री वापरतात, अशी आपल्या महाराष्ट्राची सुसंस्कृत भाषा आहे का? स्वतःचे हिंदुत्व सांगणारे अशी भाषा बोलतात आणि हेच नवाबभाईंच्या मांडीला मांडी लावून बसतात. दाऊतशी संबंध असलेले लोक यांना सरकारमध्ये चालतात. जे यांनी भाषण केले ते शिवसंपर्क नसून शिव्यासंपर्क होता, अशी टीका राणेंनी केली आहे.

हे ही वाचा:

…. असे आहे पंतप्रधान मोदींचे भगवान बुद्धांशी नाते

‘खोटी नियत, कद्रु दानत हीच या खंडणीखोर सरकारची ओळख’

अमृता फडणवीस म्हणाल्या, वजनदार ने हलके को…

दहशतवादी संघटनेकडून काश्मिरी पंडितांना धमकीचे पत्र

पुढे ते म्हणाले, भाजपामुळे शिवसेनेचे खासदार आमदार निवडून आले. भाजपा हा जगातील मोठा पक्ष आहे. निवडणुकीच्या आधी लोकांनां जी वचनं दिली त्यातील एकही ही वचन या सरकारने पूर्ण केलेलं नाही. मुख्यमंत्री फक्त व्हिडिओ कॉल वरच दिसतात. अडीच वर्षात एकदा जनतेसमोर आले या आताच्या शिवसेनेत बोगस माणसं आहेत. अपयशी मुख्यमंत्री म्हणून उद्धव ठाकरेंचं नाव येईल अशी टीका यावेळी राणेंनी केली.

पुढे ते म्हणाले, पावसाळा आला तरी अजून नालेसफाई नाही, रस्ते नीट नाहीत महानगरपालिका टेंडरमधून फक्त पैसे काढतेय. पंतप्रधान मोदींनी सांगूनही यांनी पेट्रोल डिझेल वरील वॅट कमी केलेला नाही. नेता आपल्या कार्यकर्त्यांसाठी आणि जनतेसाठी काय करतो याचे उत्तम उदाहरण म्हणजे बाळासाहेब ठकरे.

Exit mobile version