उद्धव ठाकरेंनी मुंब्र्यात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून दाखवावा!

देवेंद्र फडणवीसांनी केली घणाघाती टीका

उद्धव ठाकरेंनी मुंब्र्यात शिवाजी महाराजांचा पुतळा उभारून दाखवावा!

उद्धव ठाकरे यांनी आज घोषणा केल्याप्रमाणे शिवरायांचे पुतळे उभारूयात. मी त्यांना आवाहन करतो की, त्यांनी मुंब्र्यात शिवरायांचा पुतळा उभारावा आणि छत्रपतींना मानवंदना द्यावी, अशा शब्दांत उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी उद्धव ठाकरे यांच्या कोल्हापुरातील भाषणाला सडेतोड प्रत्युत्तर दिले. महायुतीची सभाही कोल्हापुरातच होती. तिथे फडणवीसांनी उद्धव ठाकरेंच्या प्रत्येक आरोपाला उत्तर दिले.

उद्धव ठाकरे कोल्हापूरमधील आपल्या प्रचाराच्या पहिल्या भाषणात म्हणाले की, मी सुरतेतही शिवाजी महाराजांचे मंदिर उभारणार आहे. कुणाची हिंमत असेल तर अडवून दाखवा. त्याचाही फडणवीस यांनी समाचार घेतला. ते म्हणाले की, सुरतेला जाऊन उद्धव ठाकरे हे शिवाजी महाराजांचे मंदिर बांधणार आहेत, पण नरेंद्र मोदी यांनी २२ वर्षांपूर्वीच तिथे महाराजांचा पुतळा उभारला आहे.

फडणवीस म्हणाले की, उद्धव ठाकरे म्हणतात की, महाराजांचा इंग्रजांवर राग होता म्हणून शिवाजी महाराजांनी सुरत लुटली. पण त्यांना औरंगजेबाचे नावही घ्यायची लाज वाटली. हिंदुहृदयसम्राट हे बाळासाहेब ठाकरेंच्या नावापुढून त्यांनी काढून टाकले. आता म्हणे सुरतेला जाऊन महाराजांचे मंदिर त्यांना बांधायचे आहे.

फडणवीस म्हणाले की, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आम्ही जे अडीच वर्षात करून दाखवले त्याविषयी बोलायला मविआकडे काहीही नाही. महाविकास आघाडीचे सरकार आले तेव्हा कर्नाटक पहिल्या स्थानावर होते. पण आमच्या सरकारच्या काळात महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आला. त्यांच्याच राज्यात गुजरात पहिल्या स्थानावर गेले. पण जेव्हा आमचे राज्य आले तेव्हा पुन्हा महाराष्ट्र पहिल्या स्थानावर आला. महाराष्ट्रात ५२ टक्के गुंतवणूक आली आहे. मविआ रोज खोटे बोलत आहेत. गुजरातचे प्रमोशन तुम्हीच करत आहात. तुमचा मराठी बाणा गेला कुठे?

हे ही वाचा:

‘गादी’वान झाले ताटाखालचं मांजर; मग अपमान होणारच ना ?

सरकार प्रत्येक खासगी मालमत्ता ताब्यात घेऊ शकत नाही

दिल्लीतील हवेची गुणवत्ता घसरली पराली जाळल्यामुळे आणि गाड्यांच्या धुरामुळे

‘औरंगजेबाने देशाला लुटले आणि मंत्री आलमगीरने झारखंडला लुटले’

मुलींना मोफत शिक्षण, लाडकी बहीण योजना, लखपती दीदी योदना आम्ही आणल्या. यांचा एक उमेदवार आमच्याकडे माल आला म्हणतो तर एक जण बकरी म्हणतो. कुठे गेले तुमचे संस्कार? आधी तुमचे घर सुधारा, असेही फडणवीस म्हणाले.

मुख्यमंत्र्यांनी जाहीर केली महायुतीची दशसूत्री

दरम्यान, महाराष्ट्राचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी कोल्हापुरातील महायुतीच्या पहिल्या प्रचारसभेत महायुतीचा १० घोषणांचा जाहीरनामा सादर केला. त्यात आम्ही इथे २३ तारखेला विजयाचा गुलाल उधळण्यासाठी येणार असल्याचे ते म्हणाले. लाडक्या बहिणींना आता १५०० रुपये नाही तर दरमहा २१०० रुपये मिळतील अशी घोषणाही त्यांनी केली.

– लाडकी बहीण योजनेतील महिलांना १५००ऐवजी २१०० रु.

– महिलांच्या सुरक्षेसाठी २५ हजार महिलांची भर्ती

– शेतकऱ्यांना वार्षिक सहाय्य १२ हजार मिळते ते आता १५ हजार मिळेल.

– ज्येष्ठ नागरिकांना आता पेन्शन २१०० रु.

– आवश्यक वस्तूंच्या किमती स्थिर करणार

– ४५ हजार गावांत रस्ते

– अंगणवाणी व आशा कार्यकर्त्यांना उत्तम वेतन आणि सुरक्षा

– सौर ऊर्जा व नवीकरणीय उर्जा स्रोतात गुंतवणूक करून विजेच्या बिलात ३० टक्के घट करण्याचा प्रयत्न

– २०२९ पर्यंत महाराष्ट्रात परिवर्तन आणण्यासाठी सरकार आल्यानंतर पहिल्या १०० दिवसांत महत्त्वाचे बदल

– विद्यार्थ्यांसाठी मासिक शिक्षण भत्ता आणि २५ लाख नोकऱ्या. १० लाख विद्यार्थ्यांना १० हजार रुपयांची मदत

– सगळ्यांना भोजन आणि निवारा यांची व्यवस्था

Exit mobile version