30 C
Mumbai
Friday, November 15, 2024
घरराजकारणभात्यातून बाण निसटले आता ब्लू टिक मोडले

भात्यातून बाण निसटले आता ब्लू टिक मोडले

अधिकृत वेबसाईटही बंद

Google News Follow

Related

शिवसेना उद्धव ठाकरे गटाची झोळी हळू हळू रिती होताना बघायला मिळत आहे. उद्धव ठाकरे गटाचे पक्षाचे नाव आणि चिन्ह शुक्रवारी निवडणूक आयोगाने अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांना बहाल केले. केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निर्णयानंतर शिवसेनेच्या ठाकरे गटाचा शिवसेना नावावरील दावा संपुष्टात आला आहे. उद्धव ठाकरे यांच्या भात्यातील सर्व बाण कायमस्वरूपी निसटले.

शिवसेनेचा वाघ डरकाळी फोडत शिंदे गटात आला. आणि आता ट्विटर हँडल मोडून पडले आहे. शिवसेना आता अधिकृतपणे एकनाथ शिंदे यांच्याकडे गेली आहे. त्यामुळे उद्धव ठाकरे आतापर्यंत वापरत असलेले शिवसेनेचे अधिकृत ट्विटर हॅन्डल देखील वापरता येणार नाही. उद्धव ठाकरे गटाच्या शिवसेनेच्या ट्विटर अकाऊंटवरून ब्लू टिक हटवण्यात आली आहे.  या हँडलवर क्लिक केलं की, रॉक अँड रोल असं नाव दिसत आहे.

शिवसेनेची ShivSena.in ही अधिकृत वेबसाईटही बंद पडली आहे. ठाकरे गटाने अधिकृत सोशल मीडिया अकाऊंटवर मोठे बदल केले आहेत. या बदलांचा भाग म्हणून शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर हँडलचं नाव ShivSenaUBT_असं ठेवण्यात आलं आहे. शिवसेना कम्युनिकेशन या हँडलचंही ब्ल्यू टिक गेलं असून त्या हँडलचं नाव आता ShivsenaUBTComm असं ठेवण्यात आलं आहे. म्हणजे ट्विटरच्या नियमानुसार आता हे खाते व्हेरीफाईड नाही. असे का झाले याबाबत पक्ष किंवा ट्विटरकडून कोणतेही वक्तव्य जारी करण्यात आलेले नाही.

हे ही वाचा:

हिंदुत्वाची विचारसरणी हि काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या पायदळी नेऊन ठेवली होती

तेल गेले .. तूपही जाणार ? मशाल चिन्हही गोत्यात

सूत्रधार समोर आला, सोरोस यांचा पपलू कोण?

महाशिवरात्री विशेष : का आवडतात ‘महादेवांना’ बेलपत्र?

ट्विटरच्या नियमांनुसार, एखाद्या व्हेरीफाईड युजरने त्यांचे प्रोफाइल फोटो, डिस्प्ले नाव किंवा युजर नाव (@हँडल) बदलल्यास, ब्लूटिक काढून टाकले जाते. आणि खाते पुन्हा व्हेरीफाईड होईपर्यंत ब्लूटिक दिसणार नाही. ठाकरे गटाने आता त्यांच्या ट्विटर हँडलचे नावं बदलून ‘शिवसेना – उद्धव बाळासाहेब ठाकरे’ यानुसार केले आहे. . शिवसेनेच्या हँडलमध्येच बदल झाल्याने ट्विटरच्या नियमानुसार हे ब्ल्यू टिक गेले आहे. त्यामुळे आता ठाकरे गटाला ब्ल्यू टिकसाठी पुन्हा एकदा अर्ज करावा लागणार आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
190,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा