आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंना भाजपा कार्यकर्त्यांची चिंता!

अमरावतीच्या दौऱ्यादरम्यान भाषणातून दाखविली काळजी  

आपल्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उद्धव ठाकरेंना भाजपा कार्यकर्त्यांची चिंता!

राज्याचे माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे सध्या विदर्भाच्या दौऱ्यावर असून त्यात त्यांनी नेहमीप्रमाणे भाजपाला लक्ष्य केले पण यावेळी त्यांनी आपल्या या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात भाजपा कार्यकर्त्यांची चिंता वाटत असल्याचे सांगितले.

 

ते म्हणाले की,  सध्याचे राजकारण पाहून भाजपाच्या निष्ठावंत कार्यकर्त्यांची दया येते. हे कार्यकर्ते कुणाचं ओझं घेऊन जात आहेत? त्यांचा आदर आहे. भाजपा कार्यकर्त्यांचे कुपोषण होत असून नको ते लोक ढेकर देत आहेत, असे उद्धव ठाकरे त्यांच्या भाषणात म्हणाले.

 

उद्धव ठाकरेंनी आपल्या कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करण्यासाठी हा मेळावा घेतला होता पण तिथे त्यांनी भाजपावर नेहमीच्या शैलीत आणि नेहमीचेच मुद्दे घेऊन टीका केली. पण त्यात त्यांना भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांचे काय होणार असा सूर लावला. भारतीय जनता पक्षाच्या कार्यकर्त्यांची आपल्याला चिंता लागून राहिल्याचे ते म्हणाले. त्यांनी सांगितले की, मला दया येते ती भाजपाच्या कट्टर कार्यकर्त्यांची. कुणाच्या खांद्यावर कुणाचे ओझे, हे गाणे मला यानिमित्ताने आठवते. कोणते ओझे घेऊन कार्यकर्ते जात आहे. भाजपाचे निष्ठावंत कार्यकर्ते कुणाचे ओझे घेऊन जात आहेत. त्याच वाक्य आहे कोण मेले कुणासाठी रक्त ओकून. जे भाजपा रुजविण्यासाठी झिजले. आरएसएस बद्दल आदर आहे. त्रिपुरा वगैरे इशान्य राज्यांत भाजपा कार्यकर्त्यांना लोक तुडवायेच तरीही ते पक्षात राहिले.

भाजपाच्या या कार्यकर्त्यांना सत्तेचे शिंतोडे मिळणार की नाही? असे म्हणत मी भाजपा कार्यकर्त्यांबद्दल तळमळीने बोलत असल्याचेही ते म्हणाले. जे कार्यकर्ते वाड्यापाड्यात, वस्तीत फिरले ही अवस्था कुणी केली. सत्तेतून अनेकाचं कुपोषण होतंय. अजीर्णाचे ढेकर दिले जातायत, असे म्हणत उद्धव ठाकरेंनी आपल्या पक्षाच्या झालेल्या वाताहतीचा राग भाजपावर काढला.

 

उद्धव ठाकरे हे विदर्भाच्या दोन दिवसीय दौऱ्यावर आहेत. यावेळी उद्धव ठाकरे यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना नरेंद्र मोदी आणि भाजपावर टीका केली. तसेच त्यांनी राणा दाम्पत्यांवरही टीका करत म्हटले की, अमरावती हा शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. तो राहीलच. काही लोक तात्पुरते आहेत.

घरी बसून काम केलं

“माझ्यावर टीका केली जाते की मी इतके दिवस घरी बसून होतो. होय मी घरी बसून होतो पण मी कुणाची घरं फोडली नाहीत. घरफोडे तुम्ही आहात. मला कितीही काहीही म्हणा की मी घरी बसून काम केलं. मी घरी बसून जे काम केलं ते तुम्हाला घरं फोडूनही करता येत नाही. त्यामुळेच तुम्हाला दारोदारी जावं लागत आहे,” अशी टीका उद्धव ठाकरेंनी ‘शासन तुमच्या दारी’ या मोहिमेवर केली. मी आजारी असताना गद्दारी केली गेली, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सहानुभूती मिळविण्याचा प्रयत्नही  केला.

हे ही वाचा:

मनीलाँड्रिगचे आरोप असलेले साकेत गोखले तृणमूलचे राज्यसभा उमेदवार

बेहिशोबी मालमत्ता जमवणारे पंजाबचे माजी उपमुख्यमंत्री ओमप्रकाश सोनी अटकेत

अयोध्येतील श्रीराम मंदिराच्या कामासाठी पिंडवाराचे १००० कारागीर लागले कामाला

धक्कादायक! गोरेगावमध्ये रिक्षात महिलेवर अतिप्रसंग

भाजपाला आम्हीच तारले!

“तुम्ही शून्य होता, तेव्हा बाळासाहेबांनी तुम्हाला वाचवलं. नाही तर वाजपेयींनी तुम्हाला तेव्हाच केराच्या टोपलीत टाकलं होतं. जर बाळासाहेब ठाकरे नसते, ते आताच्या पंतप्रधानाच्या मागे उभे राहिले नसते तर मोदींचं नाव सर्वोत्कृष्ट पंतप्रधानांच्या यादीत राहिलं असतं का?” असा सवाल उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला.

Exit mobile version