शिवसेना फुटण्याचे श्रेय केवळ उद्धव ठाकरे यांचे!

शिवसेना फुटण्याचे श्रेय केवळ उद्धव ठाकरे यांचे!

मनसेप्रमुख राज ठाकरे यांनी केला घणाघात

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस व मी चांगले मित्र आहोत. मला भेटण्यासाठी फडणवीस घरी आले होते. तेव्हा मी त्यांना म्हटले की, उगाच फुकटचे श्रेय तुम्ही घेऊ नका. त्यावर ते जोरजोरात हसायला लागले. जी गोष्ट घडली ती ना फडणवीसांनी घडवली, ना अमित शहा यांनी घडवली, ना भाजपने, ना अजून इतर कोणी घडवली. शिवसेना फुटण्याचे श्रेय केवळ उद्धव ठाकरे यांना जाते. हे काही शिवसेनेमध्ये एकदा घडलेले नाही. आजपर्यंत अनेक मोठे नेते, आमदार बाहेर पडले, तेव्हा मी बाहेर पडलो होतो. तेव्हाची आणि आताचीदेखील कारणे एकच आहेत. या संपूर्ण गोष्टीला उद्धव जबाबदार आहेत, असल्याची जाेरदार टीका मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी सेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांच्यावर केली आहे.

एका वाहिनीला दिलेल्या मुलाखतीत राज ठाकरे म्हणाले की, ‘उद्धव ठाकरे यांना संपूर्ण देश जेवढा ओळखत नाही; तेवढा मी चांगल्या प्रकारे ओळखतो. ते विश्वास ठेवण्यासारखे नाहीत. यापूर्वी मनसे व शिवसेनेतील टाळीसंबंधीची कथित चर्चा झाली. पण उद्धव बोलतात एक व करतात दुसरेच. त्यामुळे शिवनेतील फुटीचे श्रेय भाजपला नव्हे, तर स्वतः सेना नेतृत्वाला जात असल्याचा आराेप राज ठाकरे यांनी केला आहे.

शिवसेनेचर ऱ्हासाकडे वाटचाल

‘बाळासाहेब ठाकरे असते तर शिवसेनेत बंडखोरी झालीच नसती. ते शक्यच नव्हते. शिवसेकडे एक पक्ष म्हणून पाहू नका. बाळासाहेब होते तोपर्यंत माणसे एका विचाराने बांधली गेली होती. बाळासाहेब होते तोपर्यंत एक विचार होता आणि त्या विचाराने माणसे बांधलेली होती. त्यामुळे शिवसेनेची वाटचाल ऱ्हासाकडे सुरू झाली आहे. त्यामुळे हळहळ करण्यात अर्थ नाही. असेही राज ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा:

ऑगस्ट महिन्यात १३ दिवस बँका राहणार बंद!

मविआ सरकारच्या काळात अघोषित आणीबाणी होती!

अग्निपथमध्ये नौदल प्रवेशासाठी महिलांची पसंती

दोन वर्षात मुंबई खड्डेमुक्त करणार; मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिली ग्वाही

माताेश्री संकटात यात तथ्य नाही

सद्य:स्थितीत ‘मातोश्री’ संकटात असल्याचा दावा केला जात आहे. त्यात कोणतेही तथ्य नाही असे सांगून राज ठाकरे म्हणाले की, मातोश्री एक वास्तू आहे. त्यावर कोणतेही संकट नाही. वास्तू व संघटना वेगळी असते. सध्या संघटना म्हणजे शिवसेना लयास जाण्याच्या दिशेने वाटचाल करत आहे. तसेच खासदार संजय राऊत यांच्यामुळे सेनेत बंडखोरी झाली नाही. त्यांचा यात काय संबंध? ते रोज सकाळी टीव्हीवर येतात, अहंकारात काहीतरी बोलतात. ते तेवढ्यापुरते होते. त्यांच्या वक्तव्यांनी आमदार फुटत नाहीत.

उद्धव ठाकरे विश्वास ठेवण्यासारखे नाही

राज ठाकरे म्हणाले, “बाळासाहेब ठाकरे भावनेचा विषय होता आणि तो विषय आजारपणाचा होता. त्यामुळे मी तेव्हा फोन आल्यावर रुग्णालयात गेलो. परंतू मला उद्धव ठाकरे काय आहे हे माहिती आहे. अख्ख्या देशाला आणि महाराष्ट्राला माहिती नाही, इतका जवळून मला माहिती आहे,”.हा माणूस बोलतो वेगळं आणि करतो वेगळं. बाकीच्या माणसांसाठी मला वाईट वाटतं, पण हा माणसू विश्वास ठेवण्यासारखा नाही.”

Exit mobile version