स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की हिरक महोत्सव? उद्धव ठाकरेंचा गोंधळ

स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की हिरक महोत्सव? उद्धव ठाकरेंचा गोंधळ

भारताच्या ७५ व्या स्वातंत्र्यदिनानिमित्त उत्साह साऱ्या देशात सळसळून वाहत आहे. देशाच्या कानाकोपऱ्यात हा ‘आझादी का अमृत महोत्सव’ साजरा केला जात आहे. जम्मू, काश्मीर, लेह ,लडाख पासून केरळ, कन्याकुमारीपर्यंत सर्वत्र शासकीय यंत्रणा, सामाजिक संस्था, संघटना यांच्यामार्फत हा स्वातंत्र्य दिन साजरा केला जात आहे.

गेल्या अनेक महिन्यांपासून सरकारी पातळीवर या विशेष अशा ७५ व्या स्वातंत्र्य दिनाच्या निमित्ताने विविध कार्यक्रमांची तयारी सुरू होती. आझादी का अमृत महोत्सव या नावाखालीच ही सर्व तयारी सुरू होती. पण तरीदेखील महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव की हीरक महोत्सव? यावरून गोंधळलेले दिसले. मंत्रालयात झालेल्या ध्वजारोहण प्रसंगी मुख्यमंत्री ठाकरेंचा हा गोंधळ साऱ्या जगासमोर आला.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींची लाल किल्लयावरून ‘सबका प्रयास’ची हाक

महाराष्ट्राच्या मंत्रालयाबाहेर शेतकऱ्याचा आत्मदहनाचा प्रयत्न

‘वंदे भारत’ गाड्यांबाबत मोदींची मोठी घोषणा

भारताच्या ऑलिम्पिक चमूसोबत राष्ट्रपतींची ‘चाय पे चर्चा’

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते मंत्रालयातील ध्वजारोहण पार पडल्यानंतर त्यांनी उपस्थितांसमोर भाषण केले. त्यावेळी त्यांनी आपल्या भाषणाच्या सुरवातीलाच उपस्थितांना अमृत महोत्सावी स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा दिल्या. पण त्यानंतर भाषणाच्या दरम्यान त्यांचा गोंधळ उडाला. हा नक्की स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव आहे की हिरक महोत्सव असा प्रश्न त्यांना पडला.

भाषणाच्या वेळी त्यांच्या मागे उभे असलेल्या मुख्य सचिव सीताराम कुंटे यांना त्यांनी या संदर्भात विचारणा केली. तेव्हा कुंटे यांनी हा स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव असल्याचे सांगितले. त्यानंतर मग मुख्यमंत्र्यांनी आपले भाषण पूर्ण केले. पण महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना एवढी साधी गोष्टही माहीत असू नये याची सर्वत्र चर्चा रंगली आहे.

Exit mobile version