बळी राजाची पुन्हा निराशाच! ठाकरे सरकारकडून पुरेशी मदत नाहीच

बळी राजाची पुन्हा निराशाच! ठाकरे सरकारकडून पुरेशी मदत नाहीच

महाराष्ट्रातील ठाकरे सरकारने पुन्हा एकदा राज्यातील नुकसानग्रस्त शेतकऱ्याची निराशा केली आहे. मदतीच्या नावावर पुन्हा एकदा राज्यातील शेतकऱ्यांच्या तोंडाला पाने पुसण्याचे काम महाराष्ट्रातील सत्ताधारी ठाकरे सरकारने केले आहे. आज पार पडलेल्या राज्याच्या मंत्रिमंडळाच्या बैठकीत राज्यातील शेतकऱ्यांना दहा हजार कोटी रुपयांचे आर्थिक पॅकेज जाहीर केले आहे.

राज्यात विविध भागात अतिवृष्टीमुळे झालेल्या पूरजन्य परिस्थितीत बळीराजाचं अतोनात नुकसान झाले. या नुकसानीची सरकारी पातळीवरून दखल घेतली जाऊन मदत करण्यात आली नसल्याची टीका वारंवार होताना दिसत होती. पण अखेर ठाकरे सरकारने या नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना आर्थिक मदत जाहीर केली आहे. पण ही मदत देखील अपुरी असल्याचा सूर ऐकायला मिळत आहे.

हे ही वाचा:

पत्रकार परिषदेत महाराष्ट्र सोडून पवार पोहोचले थेट ‘पॅरिस’मध्ये

भारतीय क्रिकेट संघाच्या जर्सीने बदलले रूप

राष्ट्रवादीचे आमदार नवघरे शिवाजी महाराजांच्या घोड्यावरच उभे राहिले!

‘मी सलग पाच वर्षे मुख्यमंत्री, पण पवारसाहेब एकदाही सलग पाच वर्षे नव्हते’

राज्याचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे, उपमुख्यमंत्री अजित पवार आणि सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण यांनी चर्चा करून आजच्या मंत्रिमंडळ बैठकीत यासंबंधीची घोषणा केल्याचे समजते. राज्यात जून ते ऑक्टोबर महिन्यापर्यंत तब्बल ५५ लाख हेक्टरपेक्षा अधिक क्षेत्रावरील शेतीचे नुकसान झाल्याचे समजते. या सर्व शेतकऱ्यांना एकूण आर्थिक मदत म्हणून केवळ दहा हजार कोटी रुपयांचे अर्थसहाय्य सरकारने देऊ केले आहे. यामध्ये जिरायतीसाठी १० हजार रुपये प्रति हेक्टर, बागायतीसाठी १५ हजार रुपये प्रति हेक्‍टर, तर बहुवार्षिक पिकांसाठी २५ हजार रुपये प्रति हेक्‍टर अशा स्वरूपाची ही मदत असणार आहे.

सरकारने जाहीर केलेल्या या मदतीवरून राज्याचे राजकारण तापण्याची शक्यता आहे. या तुटपुंज्या मदतीवरून राज्यातील विरोधी पक्ष आक्रमक होण्याची शक्यता आहे.

Exit mobile version