काँग्रेसच्या धाकाने मुख्यमंत्र्याना पडला सावरकरांचा विसर!

काँग्रेसच्या धाकाने मुख्यमंत्र्याना पडला सावरकरांचा विसर!

आज दिनांक २६ फेबुवारी म्हणजे भारताचे सुपुत्र आणि थोर स्वातंत्र्य सेनानी विनायक दामोदर सावरकर यांची पुण्यतिथी. पण हे थोर स्वातंत्र्यवीर आज राज्य सरकारच्या अनास्थेचे बळी ठरत आहेत. वीर सावरकरांच्या पुण्यतिथी दिनी महाराष्ट्राच्या मुख्यमंत्र्यांना साधे अभिवादन करावेसे वाटत नाहीये. आघाडी सरकारमधील त्यांचा मित्रपक्ष असलेल्या काँग्रेसला घाबरून मुख्यमंत्री सावरकरांना विसरले असे म्हटले जात आहे. भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी यावरून मुख्यमंत्र्यावर सडकून टीका केली आहे.

राहुल गांधी यांच्या नेतृत्वातील काँग्रेस पक्षाने आजवर वारंवार सावरकरांना अपमानित केले आहे. मग कधी जाहीर भाषणातून त्यांना माफीवीर म्हणत चालवलेला अपप्रचार असुदे किंवा आपल्या ‘शिदोरी’ या मुखपत्रातून त्यांच्याविषयी केलेले खोडसाळ लिखाण असुदे. काँग्रेसच्या पाठिंब्यावर मुख्यमंत्री पद उपभोगणाऱ्या उद्धव ठाकरे यांनी कायमच काँग्रेसच्या या अपप्रचारासमोर नांगी टाकली आहे. त्यांचे हेच बोटचेपे धोरण आजही पाहायला मिळते. काँग्रेसच्या सर्व जेष्ठ, श्रेष्ठ नेत्यांना जयंती आणि पुण्यतिथी दिनी अभिवादन करणारे मुख्यमंत्री ठाकरे स्वातंत्र्यवीर सावरकरांकडे मात्र जाणीवपूर्वक कानाडोळा करताना दिसतात.

हे ही वाचा:

सावरकरांचा महानायक: चंद्रगुप्त मौर्य

शिवसेनाप्रमुखांचे नाव घेऊन राहुल गांधींसारखी वर्तणूक
मुख्यमंत्री उद्धव ठाकरे नाव शिवसेनाप्रमुखांचे घेतात पण त्यांची वर्तणूक मात्र राहुल गांधींसारखी आहे असा टोला भारतीय जनता पार्टीचे नेते आमदार अतुल भातखळकर यांनी लगावला आहे.

हे ही वाचा:

शिवसेनेचे तीन मजली नमाजप्रेम

नुसते शासकीय नाही तर पक्षीय पातळीवर देखील मुख्यमंत्र्यांचा पक्ष स्वातंत्र्यवीर सावरकरांपासून स्वतःला दूर ठेवताना दिसत आहे. ‘ज्वलंत हिंदुत्वाचा’ नारा देणाऱ्या ‘सामना’ या शिवसेनेच्या मुखपत्रातही खरे ‘हिंदुहृदयसम्राट’ असणाऱ्या सावरकरांच्या पुण्यतिथीबद्दल काहीही लिहिलेले आढळत नाही, तर शिवसेनेच्या अधिकृत ट्विटर अकाउंट वरूनही अभिवादनची कुठलीच पोस्ट दिसत नाही.

Exit mobile version