पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात जून २०२१ मध्ये भेट झाली होती. या भेटीनंतर उद्धव ठाकरे भाजपासोबत जाणार होते पण संजय राऊत यांनी त्यांना रोखल्यामुळे ते गेले नाहीत, असा गौप्यस्फोट राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते सुनील तटकरे यांनी केला आहे. हे स्वतः संजय राऊत यांनी त्यांना सांगितले असेही सुनील तटकरे म्हणाले. ‘टीव्ही९ मराठी’च्या कॉनक्लेव्हमध्ये सुनील तटकरे यांनी राजकीय मुद्द्यांवर बोलताना ही गोष्ट उघड केली.
पंतप्रधान नरेंद्र मोदी आणि ठाकरे गटाचे नेते उद्धव ठाकरे यांची ८ जून २०२१ रोजी भेट झाली होती. त्यावेळी उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होते. उद्धव ठाकरे यांनी त्यावेळी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासमोर १२ मागण्या केल्या होत्या. त्यात मराठा आरक्षण, ओबीसींचे स्थानिक स्वराज्य संस्थांमधील आरक्षण आणि पदोन्नतीतील आरक्षण हे सुद्धा मुद्दे होते. भेटीच्या वेळी अजित पवार आणि अशोक चव्हाणही होते. या भेटीच्या वेळीचं नरेंद्र मोदी आणि उद्धव ठाकरे यांच्यात दहा मिनिटे एकट्यात चर्चा झाली होती.
पुढे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या भेटीनंतर उद्धव ठाकरे भाजपासोबत जाण्यास तयार झाले होते परंतु, संजय राऊत यांनी रोखल्यामुळे तेव्हा उद्धव ठाकरे गेले नाहीत, असे सुनील तटकरे यांनी सांगितले. नरेंद्र मोदी यांच्या भेटीला उद्धव ठाकरे यांच्यासोबत अजित पवार, अशोक चव्हाणही गेले होते. तेव्हा सरकार सोडावं आणि भाजपासोबत जावं असं उद्धव ठाकरेंना वाटत होतं. हा तपशील स्वतः संजय राऊत यांनी आपणास सांगितल्याचे राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष सुनील तटकरे यांनी सांगितले.
हे ही वाचा..
इस्रोच्या लाँचपॅडवरील ‘चिनी ध्वजा’ च्या मुद्यावरून स्टॅलिन यांना चिनी भाषेत शुभेच्छा!
पुतीन यांची पाश्चिमात्य देशांना अण्वस्त्र युद्धाची धमकी
वायनाडमध्ये कॉलेजवयीन विद्यार्थ्याची आत्महत्या; डाव्या चळवळीतील संघटनेच्या सहा सदस्यांना अटक
ब्रिटनस्थित गँगस्टरने स्वीकारली नाफेसिंग राठी यांच्या हत्येची जबाबदारी
संजय राऊत यांच्या आग्रहखातर एकनाथ शिंदे, मिलिंद नार्वेकर, अजित पवार, सुनील तटकरे यांची बैठक झाली. त्यातही राऊत यांनी उद्धव ठाकरे आणि नरेंद्र मोदी यांच्या भेटीबाबतचे मत व्यक्त केलं. पण उद्धव ठाकरे यांना भाजपासोबत जाण्याची इच्छा असल्याचे संजय राऊत यांनीच सांगितलं, असा दावा सुनील तटकरे यांनी केला.