…पण उद्धव ठाकरे यांनी आमचे ऐकून घेतले नाही!

…पण उद्धव ठाकरे यांनी आमचे ऐकून घेतले नाही!

शेवटी नेत्याने पण कार्यकर्त्यांचे ऐकले पाहिजे, पण आमचं उद्धव ठाकरे यांनी ऐकून घेतले नाही, अशी शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट शब्दात आपली नाराजी व्यक्त केली आहे. शिवसेना प्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्यावर टीका करणार नाही, असे एकनाथ शिंदे गटाकडून वारंवार सांगण्यात आले. परंतु आमदार गुलाबराव पाटील यांनी पहिल्यांदाच उद्धव ठाकरे यांच्यावर जाहीर टीका केली आहे.

आम्ही हेच सांगायला गेलो होतो की, अजूनही वेळ गेलेली नाही, त्यांना परत बोलवा. परंतु, संजय राऊत यांनी सांगितलं निघून जा. मग ठरवलं मंत्रिपद गेलं खड्ड्यात आणि उठाव केला, अशा शब्दात शिवसेनेचे आमदार गुलाबराव पाटील यांनी स्पष्ट शब्दात नाराजी व्यक्त केली.

ठाकरे मुख्यमंत्री झाल्यावर काेणाशी संवाद साधायचा

उद्धव ठाकरेंबद्दलची मनातली खदखद व्यक्त करताना गुलाबराव पाटील म्हणाले, उद्धव ठाकरे पक्षप्रमुख होते, तेव्हा त्यांच्याशी सहज बोलता येत होतं. परंतु, उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर आम्ही कुणाकडे बोलायचं? हा माझा व्यक्तिगत प्रश्न नव्हता, पण पहिल्यांदा आमदार झालेल्यांची अडचण होती. त्यामुळे आम्ही वारंवार हे प्रश्न वेगवेगळ्या मार्गाने त्यांच्यासमोर मांडण्याचा प्रयत्न केला, असेही पाटलांनी सांगितले.

ठाकरेंनी शाखेवर फिरावं हे दुर्दैव

शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांना शिवसेनेच्या शाखांवर फिरावं लागत आहे यासारखं दुसरं दुर्दैव नाही. उद्धव ठाकरे तसेच आदित्य ठाकरे यांनी आधीच हे दौरे केले असते तर कदाचित ही वेळ आली नसती. असा टोला आमदार गुलाबराव पाटील उद्धव ठाकरे आणि आदित्य ठाकरे यांना लगावला आहे.

Exit mobile version