ठाकरे गटात संवादाचा अभाव असून उद्धव ठाकरेंनी लोकांच्या अपेक्षेएवढा वेळ लोकांना दिला नाही, अशी टीका शिवसेना नेत्या नीलम गोऱ्हे यांनी केली. काही दिवसांपूर्वीचं नीलम गोऱ्हे यांनी उद्धव ठाकरेंना राम राम करत एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वातील शिवसेनेत प्रवेश केला.
नीलम गोऱ्हे यांनी ‘एबीपी माझा’ या वृत्तवाहिनीला दिलेल्या मुलाखतील उद्धव ठाकरेंवर टीकास्त्र डागले. “मी कोणतेही पद डोळ्यासमोर ठेऊन शिंदे गटाच्या शिवसेनेत प्रवेश केला नाही. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री असताना त्यांना पत्र दिले होते. लोकांना त्यांनी भेटावं यासंदर्भात त्यांना सांगितले. मात्र, जेवढी लोकांची अपेक्षा आहे, तेवढा वेळ उद्धव ठाकरेंनी दिला नाही. ठाकरे गटात संवादाचा अभाव आहे,” अशी टीका विधानपरिषदेच्या उपसभापती नीलम गोऱ्हे यांनी केली.
उद्धव ठाकरे मुख्यमंत्री व्हावेत अशी इच्छा होती. ते मुख्यमंत्री झाल्यानंतर पक्ष संघटनेला गती येईल, अशी अपेक्षा होती. मात्र, तसे काही घडले नाही, अशी खंत नीलम गोऱ्हे यांनी व्यक्त केली. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री झाल्यानंतर एवढं बंदिस्त राजकारण होईल असं वाटलं नव्हतं. त्यांचे पक्ष संघटनेकडे दुर्लक्ष झाल्याचेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या. उद्धव ठाकरे मुख्यमंत्री होताच आणि आजारी पडल्यानंतर चर्चेची दार बंद झाल्याचेही नीलम गोऱ्हे म्हणाल्या.
हे ही वाचा:
समृद्धी महामार्गावर एअर ऍम्ब्युलन्स सेवा सुरू होणार
आणखी एका चित्त्याचा कुनो राष्ट्रीय अभयारण्यात मृत्यू
मायक्रोसॉफ्टमध्ये पुन्हा नोकरकपात
पाकिस्तानात मुसळधार पावसामुळे हाहाःकार; ८६ जणांचा मृत्यू
उद्धव ठाकरेंनी मातोश्रीवर बोलावले तर भेट घ्यायला जाईन. मात्र, आता त्यांच्या गटात प्रवेश करणार नाही. त्यांना जास्त त्रास द्यायला नको म्हणून मी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वात काम करण्याचा निर्णय घेतला आहे, असं नीलम गोऱ्हे म्हणाल्या.