मुख्यमंत्री फडणवीस, सोमय्यांबद्दल बोलताना ‘घसरले’!

मुख्यमंत्री फडणवीस, सोमय्यांबद्दल बोलताना ‘घसरले’!

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री आणि शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी बीकेसीत झालेल्या सभेत पातळी सोडून भाष्य केले.   विरोधी पक्ष नेते देवेंद्र फडणवीस, भाजपा नेते किरीट सोमय्या, जनसंघ, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ यांच्यावर त्यांनी खालच्या भाषेत टीका केली. देवेंद्र फडणवीस यांच्यावरील राग उद्धव ठाकरे यांनी काढला.

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांना त्यांनी अगदी सुरुवातीपासून लक्ष्य केले. बाबरी मशिदीचा ढाचा पाडण्यासाठी आपण गेलो होतो, या फडणवीस यांनी मागे केलेल्या वक्तव्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, मी गेलो होतो तेव्हा असे फडणवीस म्हणतात तेव्हा वय काय होते त्यांचे? शाळेतली सहल होती की काय? बाबरी बघायला चला, बाबरी बघायला चला. काय वय तुमचं, बोलता काय, तुम्ही देशासाठी काय केलं. बाबरी तर पाडली नाहीतच तुम्ही गेला होतात तिकडे तर तुम्हीच त्या ढाच्यावर चढला असतात तर बाबरी खाली आली असती. लोकांना श्रम करावे लागले नसते, असे शब्द त्यांनी वापरले.

किरीट सोमय्या यांच्याबद्दलही त्यांनी पातळी सोडली. ते म्हणाले की, महाराष्ट्र पुढे जात आहे. यांना ते बघवत नाही. कायदा सुव्यवस्थेचे बारा वाजल्याचे दाखवतात. हे का करत आहात. केंद्राची सुरक्षा असताना हल्ला कसा झाला, सॉसची बाटली कुणी दिली. बाळासाहेब ठाकरे यांची पाकिस्तानच्या जावेद मियाँदादने घेतलेल्या भेटीचा किस्सा सांगतानाही त्यांनी सोमय्या यांच्या शारीरिक व्यंगावर भाष्य केले. ते म्हणाले की, मियाँदाद आलेला असताना त्याला ते म्हणाले की, तू चांगला खेळतोस पण माकडचाळे का करतोस. तेव्हा तो म्हणाला की, आम्ही फलंदाजाचे लक्ष विचलित करण्यासाठी असे करतो. स्लिप, सिली पॉइंटमध्ये उभे राहून त्या सेट झालेल्या फलंदाजाला चिडवतो. एका फलंदाजाला बोबड्या भाषेत मी चिडवले तेव्हा राग येऊन त्याचे लक्ष विचलित झाले आणि तो बाद झाला. असे सांगत उद्धव म्हणाले की, आता जो बोबडे बोलतो त्याच्याबद्दल मी हे बोलत नाही. बोबड्यांकडे लक्ष देऊ नका.

हे ही वाचा:

मुंबईत एनसीबीची मोठी कारवाई, दीड कोटींचे ड्रग्ज जप्त

माणिक सहा होणार त्रिपुराचे नवे मुख्यमंत्री

हिंदुत्वाच्या नावावर हिंदू संघटनांवरच टीका! कारसेवकांचाही अपमान

…म्हणून वडिलांना यकृतदान करण्यापासून कोर्टाने मुलीला रोखले!

 

मनसेप्रमुख राज ठाकरे यांच्यावर टीका करताना त्यांच्यात मुन्नाभाई एमबीबीएसमधील संजय दत्त जसा शेवटी आपला केमिकल लोचा झाल्याचे जसे म्हणतो, तसाच काही केमिकल लोचा झाला आहे.

मुख्यमंत्री या नात्याने त्यांचे भाषण विषयाला धरून होईल, असे वाटले होते, पण त्यांनी नेहमीचा रटाळ सूर लावला अशी टीका भाजपाने केली.

Exit mobile version