तब्बल ४० आमदारांसह बाहेर पडलेल्या मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबद्दल माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या मनात असलेला टोकाचा रोष कायम आहे. शिवसेनेच्या महिला संघटक आणि संपर्कप्रमुख तसेच महिला विभाग संघटकांच्या झालेल्या बैठकीत उद्धव ठाकरे एकनाथ शिंदे यांच्यावर आपल्या नेहमीच्या टोमणेअस्त्राचा वापर करण्यापासून स्वतःला परावृत्त करू शकले नाहीत.
एकनाथ शिंदे यांनी एक रिक्षाचालक ते मुख्यमंत्री अशा केलेल्या वाटचालीची थट्टा उद्धव ठाकरे यांनी उडविली. मुख्यमंत्री असतानाही उद्धव ठाकरे यांनी विरोधकांवर टोमण्यांचा मारा करत स्वतःवरील टीकेला उत्तर देण्याचा वारंवार प्रयत्न केला होता. त्यावर तत्कालिन विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी त्याला टोमणेबॉम्ब अशी उपमा दिली होती.
विधानसभेतील एकनाथ शिंदे यांच्या भाषणाची टवाळी करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, काल रिक्षावाल्याची रिक्षा सुसाट सुटली होती, त्याला ब्रेक नव्हता, सुसाट सुटला होता. सगळ्यांच्या चेहऱ्यावर टेन्शन होते की, अपघात तर होणार नाही ना. उपमुख्यमंत्र्यांनी तर त्यांचा माईक खेचला, पुढे काय काय खेचतील ते माहीत नाही.
हे ही वाचा:
डबघाईला आलेल्या पाकव्याप्त काश्मीर सरकारने खरेदी केल्या आलिशान गाड्या
नुपूर शर्मांवर संतप्त झालेल्या न्यायाधीशांविरोधात माजी न्यायाधीश, आयएएस अधिकारी
‘आज्ञेचे पालन म्हणून, उपमुख्यमंत्री झालो’
‘लक्ष्य ऑलम्पिक मिशन’ सदस्य समितीमध्ये आमदार आशिष शेलार यांची नियुक्ती
पुरुषांनी गद्दारी केली आता महिलांना पुढे आणले पाहिजे, असे म्हणत उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा एकनाथ शिंदे यांच्यासह बाहेर पडलेल्या आमदारांवर टोमणेबॉम्बचा वापर केला. या आमदारांना एकीकडे गद्दार म्हणताना आता शिवसेनेत कोण आले, कोण गेले याची पर्वा नाही, असा सूरही आळवला.
एकनाथ शिंदे यांच्या नेतृत्वाखाली ४० आमदारांनी बाहेर पडत आपणच खरी शिवसेना असल्याचे सांगितले आणि भाजपासोबत नवे सरकारही स्थापन केले. शिंदे यांनी घेतलेला हा पवित्रा ठाकरे कुटुंबियांना मात्र वर्मी लागला आहे.