उद्धव ठाकरेंचे दरवाजे आता बंद

एकनाथ शिंदेंकडे जाणाऱ्यांना पुन्हा प्रवेश नाही, उद्धव ठाकरेंचा निर्णय

उद्धव ठाकरेंचे दरवाजे आता बंद

उद्धव ठाकरेंच्या गटात काही कार्यकर्त्यांनी रविवार ७ जानेवारी रोजी प्रवेश केला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मनोगत व्यक्त करताना म्हटले की, एकनाथ शिंदे आणि त्यांच्या समर्थनार्थ गेलेल्या लोकांसाठी ठाकरे गटाचे दारे आता बंद आहेत.

भटकंती करायला गेलेल्यांना परत घरात घेणार नाही, असा इशारा उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदे यांच्याकडे जाणाऱ्या शिवसैनिकांना दिला आहे. खोके, गद्दार यांचा पुनरुच्चार करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, खोक्यात बंद झालेल्यांना खोक्यातून परत काढण्याची गरज नाही. खोके घेणारे पक्ष, चिन्ह सगळ घेतलं तरी त्यांना स्वप्नात उद्धव ठाकरे दिसतो. उद्धव ठाकरे एकटा नाही. महाराष्ट्र सोबत आहे असे म्हणत उद्धव यांनी आव्हान दिले की, विरोधी पक्षाला आवाहन केले आहे की तुम्ही तिन्ही निवडणुका घ्या. लोकसभा, विधानसभा आणि पालिका निवडणूका एकत्र लावा. गल्लीपासून दिल्लीपर्यंत काय आहे ते कळेल. लवकरच राम राज्य येणार आहे, असंही उद्धव ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा:

अजित पवार म्हणाले, ८० वय झालं तरी माणूस थांबत नाही

पोटातून आणलेली कोकेनची कॅप्सूल पकडली; सकिनाका येथे दोन विदेशी नागरिकांना अटक!

मराठी माणसाच्या नाट्यप्रेमामुळे १०० वर्षांची परंपरा लाभली!

उद्धव ठाकरे यांनी काळाराम मंदिरात जाणार असल्याचा पुनरुच्चार केला.  २३ जानेवारीला नाशिकला कार्यक्रम जाहीर केला आहे. काळाराम मंदिरात जाणार आहे. काळाराम मंदिरात जाऊन रामाचे दर्शन घेणार आहोत, असे ते म्हणाले. उद्धव ठाकरे यांना अद्याप अयोध्येतील प्रभू श्रीरामाच्या प्राणप्रतिष्ठा सोहळ्याचे निमंत्रण देण्यात आलेले नाही. त्यावरून सध्या उद्धव ठाकरे गटात नाराजी आहे आणि त्याविषयीची चरफड त्यांच्याकडून सातत्याने व्यक्त होत असते.

एकनाथ शिंदे यांचे पुत्र खासदार श्रीकांत शिंदे यांच्या मतदारसंघात उद्धव ठाकरे दौरा करणार असल्याचे सांगण्यात आले. १३ जानेवारी रोजी उद्धव ठाकरे कल्याण मतदारसंघात दौरा करणार आहेत. विविध शाखांना उद्धव ठाकरे भेट देणार असून यावेळी पदाधिकाऱ्यांच्या बैठका पार पडणार आहेत.

Exit mobile version