एकनाथ शिंदे यांनी ४० आमदारांना सोबत घेऊन सत्तांतर घडवत उद्धव ठाकरे यांना मोठा धक्का दिला. शिंदे गटाचे वर्चस्व वाढत असलेल्या सत्तांतराच्या काळातील विविध राजकीय घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांना मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा द्यावा लागला. ठाकरे यांनी मुख्यमंत्री पदाचा राजीनाम्याबरोबरच आमदारकीचा राजीनामा देणार असल्याची घोषणा केली होती. पण महाविकास आघाडीच्या काळात आधीच्या फडणवीस सरकारने घेतलेल्या अनेक निर्णयांना स्थगिती दिली गेली तशीच स्थगिती उद्धव ठाकरे यांनी आपल्या स्वतःच्याच आमदारकीच्या राजीनाम्यालाही दिली आहे. विधान परिषदेतील सध्याची संख्याबळाची स्थिती घेऊन कॉंग्रेसचा सल्ला उद्धव ठाकरे यांनी ऐकून आता आपण आमदारकीचा राजीनामा देणार नसल्याचं म्हटलं आहे.
उद्वव ठाकरे यांनी राष्ट्रवादी आणि कॉंग्रेस सरोबत सत्तेसाठी युती केली होती आणि आपल्या गळ्यात मुख्यमंत्री पदाची माळ घातली. त्यावेळी भाजप आणि सेनेत अडीच अडीच वर्षाचे मुख्यमंत्रीपदाचे ठरल्याचे अमित शहा यांनी आपल्याला बंद दाराच्या आड सांगितले होते असे सांगितले होते. अमित शहा यांनी असा कोणताही शब्द दिलेला नसल्याचे फडणवीस यांनी त्यावेळी स्पष्ट केलं होतं. पण त्यावेळीही उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपदाची माळ आपल्या गळ्यात घालून घेतली होती. मात्र अडीच वर्षे कारभार केल्यानंतर ठाकरे यांनी जेव्हा मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला तेव्हाच आमदारकीचा राजीनामा देत असल्याचे जाहीर केले होते. त्यामुळे त्यांनी राजीनामा दिलेला आहे असाच समज लोकांचा झालेला होता. पण ठाकरे यांच्या या नव्या कोलांटउडीने सर्वांनाच बुचकळ्यात टाकले आहे.
वास्तविक हा राजीनामा न देण्याच्या नाट्यामागे विधान परिषदेतील आमदारांचे संख्याबळ हे मुख्य कारण आहे. राजकीय भूकंप घडवत एकनाथ शिंदे हे एका रात्रीत ४० पेक्षा जास्त आमदारांना आपल्या सोबत अगोदर सुरत आणि मग गुवाहाटीला घेऊन गेले. शिंदे यांच्याबरोबर गेलेले सर्व आमदार त्यांना सोडून सेनाभवनावर येतील अशी आशा उद्धव ठाकरे यांना वाटत होती. त्यामुळे उद्धव ठाकरे यांनी या आमदारांना परत येण्याची सादही घातली होती. परंतु सुरत, गुवाहाटी, गोवा आणि मुंबई या संपूर्ण प्रवासात राज्यातील राजकीय घडमोडी झपाट्याने बदलल्या. पक्षप्रमुख सेनेच्या आमदारांना भेटत नाहीत, त्यांचे प्रश्न सोडत नाहीत ही या ४० आमदारांच्या मनातील सल ठाकरे काही दूर करू शकले नाही. या सर्व आमदारांनी देखील आपल्या भूमिकेवर ठाम राहत शिवसेना भवनाकडे पाठ फिरवली. या सर्व राजकीय घडामोडीनंतर उद्धव ठाकरे यांना राजीनामा दिला आहे.
हे ही वाचा:
चंदीगडच्या स्टेडियममध्ये ७ हजार विद्यार्थ्यांनी बनवला मानवी तिरंगा
‘पाच वर्षाची काम अडीच वर्षात करणार’
चिनी कट उधळला, व्हीएलसी मीडियावर बंदी
सत्ता बदलली आणि अटलजींचा पुतळा उभा राहिला
शिवेसेनेचे ४० आमदार एकनाथ शिंदे घेऊन गेल्यामुळे आता विधानपरिषदेतील आमदारांचे गणित विस्कटले आहेत. आता एका आमदाराची नितांत गरज आहे. त्यामुळेच विधानसभेतील गणित जुळवण्यासाठी कॉंग्रेसने ठाकरे यांना आमदारकी सोडू नये असा सल्ला दिला. ठाकरे यांनी हा सल्ला मानून आमदारकी कायम ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. मुख्यमंत्रीपदावरून पायउतार झाल्यानंतर उद्धव ठाकरे यांनी शाखा पातळीवर काम केल्याचे बघायला मिळत होते. त्यामुळे उद्धव ठाकरे राजीनामा देऊन पक्ष संघटनेवर लक्ष केंद्रीत करतील असे वाटले होते. पण त्यांनी आता पुन्हा कलटी मारल्याची चर्चा आहे.
मराठी माणसाचा मुद्दा रेटला
मार्मिकच्या ६२ व्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात बोलताना पुन्हा एकदा मराठी माणसाचा मुद्दा रेटला.शिवसेना नसती तर मराठी माणसाचं काय झालं असतं असं भावनिक विधान केलं. संपूर्ण देशभरात स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाचा उत्साह आहे. प्रत्येकाच्या घरात तिरंगा डौलाने फडकत आहे. या अमृतमहोत्सवाच्या निमित्ताने हितगूज करण्याएेवजी टीका करण्यावरच ठाकरे यांनी या कार्यक्रमात भर दिला.