28 C
Mumbai
Wednesday, December 25, 2024
घरराजकारणउद्धव ठाकरे यांची शिष्टाई फेल.. सुनील कलाटे बंडखोरीवर ठाम

उद्धव ठाकरे यांची शिष्टाई फेल.. सुनील कलाटे बंडखोरीवर ठाम

कसबा, चिंचवडमध्ये तिरंगी लढती

Google News Follow

Related

अखेर चिंचवड विधानसभा पोटनिवडणुकीत शिवसेनेच्या उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राहुल कलाटे आपली बंडखोरी कायम ठेवली आहे. राहुल कलाटे यांचे मन वळवण्याची पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांची शिष्टाई फेल ठरली आहे. कलाटे यांनी अर्ज मागे घ्यावा म्हणून उद्धव ठाकरे यांचा निरोप घेऊन सचिन अहीर पुण्यात पोहचले पण त्यांनी केलेली मनधरणी देखील कामी आलेली नाही. आता पक्षातील नेतेच उद्धव ठाकरे यांचे ऐकत नसल्याचे यावरून दिसून आले आहे. कलाटे हे अपक्ष निवडणूक लढवत आहेत. दुसऱ्या बाजूला कसबा येथे हिंदू महासभेचे आनंद दवे यांनी दाखल केलेला अर्ज कायम ठेवला आहे. त्यामुळे त्या मतदार संघात तिरंगी लढत होणार आहे. दवे यांच्या उमेदवारीचा महाविकास आघाडीला फटका बसणार असल्याचे चित्र दिसत आहेत.

उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी करत अपक्ष अर्ज दाखल केला होता. त्यांचे मन वळवण्यासाठी उद्धव ठाकरे यांनी सचिव अहिर यांना निरोप घेऊन पुण्यात पाठवले. उद्धव यांचे दूत सचिन अहिर यांनी  कलाटे यांची त्यांच्या वाकड येथील निवासस्थानी भेट घेतली आणि त्यांना माघार घेण्यासाठी विनंती केली . ही बैठक तासाभराहून अधिक चालली.अहिर यांची कलाटे यांच्या बरोबर चर्चा झाली. पण त्याचा काही फायदा झाला नाही. नंतर खुद्द उद्धव ठाकरे यांच्याशीही फोनवरून बोलणे झाले पण कलाटे विनंती आदेशाला बधले नाहीत.

प्रसार माध्यमांशी संवाद साधताना राहुल कलाटे यांनी आपण कार्यकर्त्यांशी बोलून पुढील निर्णय घेऊ, असे सांगितले होते.  कलाटे म्हणाले की, आपली सचिन अहिर यांच्याशी चर्चा झाली. त्यांनी उद्धव ठाकरे याना फोन लावून दिला. त्यांच्याशीही चर्चा केली. मी ठाकरे यांचा अनादर करणार नाही. मात्र, सर्व प्रमुख कार्यकर्त्यांशी बोलून निर्णय घेणार असे सांगितले होते. पण तरीही शेवटपर्यंत ते आपल्या अपक्ष उमेदवारीवर ठाम राहिले. उद्धव ठाकरे यांच्या बरोबरच शिवसेनेतील अन्य बड्या नेत्यांनी लावलेला जोर शेवटी फोल ठरला आहे.

हे ही वाचा:

काश्मीरमध्ये आढळला देशातील पहिला लिथियमचा साठा

करून गेले उद्धवराव आणि नाना पटोलेंचे नाव…

आदित्य ठाकरे पोपटपंची काय करता ?

इस्रोचे सर्वात लहान रॉकेट एसएसएल- डी २ अंतराळात झेपावले

कळते यांच्या अपक्ष उमेदवारीनंतर विधानसभेच्या कसबा निवडणुकीतील रांगत वाढली आहे. या निवडणुकीत भाजपकडून हेमंत रासने, महाविकास आघाडीकडून काँग्रेसचे रवींद्र धंगेकर आणि हिंदू महासंघाकडून आनंद दवे आणि कसब्यात अविनाश मोहिते रिंगणात आहेत. या पोटनिवडणुकीतून संभाजी ब्रिगेडने माघार घेतल्याची घोषणा केली आहे. चिंचवडमध्ये भाजपकडून दिवंगत आमदार लक्ष्मण जगताप यांच्या पत्नी अश्विनी जगताप, महाविकास आघाडीकडून राष्ट्रवादी काँग्रेसचे नाना काटे लढत आहेत. पण महाविकास आघाडीत उद्धव ठाकरे सेनेचे राहुल कलाटे यांनी बंडखोरी केली आहे.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
216,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा