ठाण्यात सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे यांच्यावर हल्ला झाल्याचे प्रकरण सध्या चांगलेच गाजते आहे. सोमवार, ३० ऑगस्ट रोजी कल्पिता यांच्यावर हल्ला झाला. यात कल्पित यांनी आपली दोन बोटे गमावली. पण इतक्या गंभीर विषयात राज्याचे प्रमुख असणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मात्र ४ दिवसांनी जाग आली. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी कल्पिता यांची विचारपूस करायला शुक्रवार, ३ सप्टेंबर रोजीचा मुहूर्त सापडला. पण तेव्हाही त्यांनी राजकारण मधे आणले.
मुख्यमंत्र्यांच्या वर्षा निवासस्थानापासून अवघ्या तासाभरावर असणाऱ्या रूग्णालयात कल्पिता उपचार घेत आहेत. पण तरिही मुख्यमंत्री उद्धव ठाकरे त्यांना भेटायला आले नाहीत. इतर वेळी आपले गाडी चालवण्याचे कौशल्य दाखवत थेट पंढरपूरपर्यंतचा पल्ला गाठणाऱ्या मुख्यमंत्र्यांना मुंबई शेजारच्या ठाण्यात येणे जड झाले. त्यांनी कल्पिता यांच्याशी फोनवरून संवाद साधला.
हे ही वाचा:
राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची महिला सरपंचाला मारहाण
अँटिलिया, मनसुख हत्याप्रकरणी १० जणांवर भलेमोठे आरोपपत्र
दुबई एक्सपो २०२० मध्येही उभे राहणार राम मंदिर
हरवलेली ‘ओबीसी मंत्रिमंडळ उपसमिती’ शोधण्यासाठी ‘टास्क फोर्स’ची स्थापना करा
यावेळीही बोलताना मुख्यमंत्र्यांनी मधे राजकारण आणले. ‘मी भेटलो असतो किंवा आधी फोन केला असता तर त्यात राजकारण आलं असतं’ असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. वास्तविक या संपूर्ण प्रकरणात राजकारण येण्याचा तसा काही संबंध नव्हता. विविध पक्षांचे राजकीय नेते कल्पिता यांना भेटून गेले. पण कोणीही या प्रकरणाचे राजकारण केलेले दिसले नाही. मग मुख्यमंत्र्यांनाच अशी राजकीय शंका का यावी असा प्रश्न उपस्थित होताना दिसत आहे.
भारतीय जनता पार्टीचे ठाणे शहर उपाध्यक्ष सुजय पत्की यांनी या प्रतिक्रियेवरून मुख्यमंत्र्यांवर निशाणा साधला आहे. “ठाणे महापालिका सहाय्यक आयुक्त कल्पिता पिंपळे ह्या कर्तव्यदक्ष अधिकारी महिलेवर माथेफिरु हल्लेखोराने हल्ला केला त्यात त्या जबर जखमी झाल्या. ह्या घटनेला ४ दिवस झाले. मध्यंतरीच्या काळात राजकीय नेत्यांनी आपल्या संवेदना व्यक्त केल्या. आज मुख्यमंत्री महोदयांनी त्यांना फोन करून त्यांच्या तब्येतीची विचारपूस केली आणि म्हणाले, ‘मी भेटलो असतो किंवा आधी फोन केला असता तर त्यात राजकारण आलं असतं’.
राज्याच्या प्रमुखाने भेट घेतली असती किंवा आधीच फोनवर संवाद साधला असता तर राजकारण केलं असा आरोप कोणी आणि का केलं असता? उलट अशावेळेस अशा अधिकाऱ्यांशी संवाद साधून त्यांचं मनोबल वाढवणं आवश्यक आहे आणि ते कोणीही केलं तरी हवंच आहे. कोणीतरी राजकारण केलं असतं म्हणणं हेच राजकारण नाही का?” असा सवाल पत्की यांनी विचारला आहे.