नागपूर हिवाळी अधिवेशनात गुरुवारी वेगळेच चित्र बघायला मिळाले. शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे आणि मंत्री दीपक केसरकर यांच्यात शाब्दिक चकमक उडाली. तुम्हाला एवढं मोठं केलं आम्ही तुमचं काय वाईट केलंय? तुम्ही आमच्याशी एवढे निर्दयीपणे कसे वागू शकता, असा उद्विग्न सवाल उद्धव ठाकरे यांनी केसरकर यांना केला.
हा वाद होण्याच्या काही काळ अगोदर झालेल्या पत्रकार परिषदेत विरोधकांनी सत्ताधाऱ्यांना घाम फोडला असा दावा उद्धव ठाकरे यांनी केला होता. पण अधिवेशनाच्या पहिल्या दिवसापासून सत्ताधाऱ्यांना दिशा सालियन आणि उमेश कोल्हे प्रकरणाचा मुद्दा ज्या प्रकारे लावून धरला त्याची अस्वस्थता ठाकरे यांच्या या वाक्यावरून दिसून आली. त्याही पेक्षा सरकारवरून पाय उतार झाल्यापासून ते आता पर्यंत राज्यात झालेल्या घडामोडीबद्दल मनात असलेला राग त्यांच्या या शब्दातून व्यक्त झाला.
मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्यावर त्यांचा मूळ राग होता. पण वड्याचे तेल वांग्यावर म्हणतात त्याप्रमाणे उद्धव ठाकरे यांनी केसरकर यांच्यावर राग काढला अशी चर्चा राजकीय वर्तुळात सुरू झाली आहे. विधान परिषदेच्या कामकाजा संदर्भात मंत्री केसरकर हे उपसभापती नीलम गोऱ्हे यांच्या दालनात गेले होते. त्यावेळी उद्धव ठाकरे हे देखील त्या ठिकाणी उपस्थित होते . त्याचवेळी दोघांमध्ये शाब्दिक खटके उडाल्याचे सांगण्यात येते. ठाकरे आणि केसरकर यांची भेट होताच ठाकरे यांनी तुम्ही इतके निर्दयपणे कसे वागू शकता? आम्ही काय वाईट केले तुमचं असाही सवाल ठाकरे यांनी केसरकर यांना केला.
अधिवशेन सुरू झाल्यावर विरोधकांनी सत्ताधाऱ्यांवर हल्लाबोल करत त्यांना कोंडीत पकडण्याचा प्रयत्न केला. अधिवेशनाच्या पहिल्याच दिवशी शिंदे गटाच्या आमदारांनी दिशा सालियन प्रकरणाची एसआयटी चौकशी करण्याची मागणी केली. गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी ही मागणी मान्य करत एसआयटी चौकशी करण्याचे आदेश दिले. त्याच प्रमाणे अमरावतीच्या उमेश कोल्हे प्रकरणात तत्कालीन मुख्यमंत्री उध्दव ठाकरे यांनी केलेल्या फोनची चौकशी करण्याची मागणी करण्यात आली. एकाच कुटुंबातील दोन जणांच्या चौकशा करण्याच्या प्रकरणामुळे उद्धव ठाकरे अस्वस्थ असल्याचे यावरून दिसले.
हे ही वाचा:
पंतप्रधानांच्या मातोश्री हीराबेन यांची प्रकृती खालावली; रुग्णालयात दाखल
मुंबई महाराष्ट्राचीच, ती कोणाच्या बापाची नाही
तैलचित्रातून दिसेल बाळासाहेबांचा वारसदार
खंडणी प्रकरणी उद्धव ठाकरे गटाच्या माजी नगरसेवकाला अटक
दिशा सालियन प्रकरणात आदित्य ठाकरे यांना गोवण्याचा प्रयत्न होत असल्याचे उद्धव ठाकरे गटाला वाटत आहे.राज्यात झालेला सत्ता संघर्ष, दिशा सालियन प्रकरणात सत्ताधाऱ्यांनी आक्रमक होत au, au कोण असे म्हणत विधानसभेच्या पायऱ्यांवर केलेले आंदोलन बघता ठाकरे यांची उद्विग्नता वाढली असल्याचे दिसून आले.त्यातूनच त्यांनी असा प्रश्न विचारल्याची चर्चा आहे. राज्यातील सत्तांतरांतर उद्धव ठाकरे आणि केसरकर यांची पहिल्यांदाच प्रत्यक्ष भेट होत असल्याचे म्हटल्या जात आहे.