‘परमबीर गायब’वर टिप्पणी, पण अनिल देशमुखांबद्दल शब्द नाही

‘परमबीर गायब’वर टिप्पणी, पण अनिल देशमुखांबद्दल शब्द नाही

मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या वक्तव्याबद्दल आश्चर्य

गेल्या वर्षीपर्यंत महाराष्ट्रातील महाविकास आघाडीच्या खास मर्जीतील असलेले परमबीर सिंग आता गायब आहेत. परमबीर यांनी महाविकास आघाडीच्या माजी गृहमंत्री अनिल देशमुखांविरोधात आरोप केल्यानंतर मात्र ते नकोसे झाले आहेत. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी औरंगाबाद येथील भाषणात तक्रार करणारेच गायब आहेत, अशी टिप्पणी करत परमबीर यांना लक्ष्य करण्याचा प्रयत्न केला, मात्र त्यांच्या सरकारमधील अनिल देशमुख हेसुद्धा बरेच दिवसांपासून गायब आहेत, याविषयी त्यांनी शब्दही काढला नाही.

मुंबई उच्च न्यायालयाच्या औरंगाबाद खंडपीठाच्या विस्तारित इमारतीचं उद्घाटन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्या हस्ते करण्यात आलं. त्यावेळी ते म्हणाले की, आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे. कुठे गेला माहीत नाही. केस सुरू आहे. तिथे उपस्थित असलेले न्यायाधीश चंद्रचूड यांना उद्देशून ते म्हणाले की, चंद्रचूड साहेब आमच्याकडे तक्रारदारच गायब आहे. तरीही केस सुरू आहे. तक्रारदार गायब, कुठे पळून गेला माहीत नाही. पण आरोप केलेत ना मग खणून काढ… खणलं जातंय… चौकश्या सुरू आहे. धाडसत्रं सुरू आहे. या पद्धतीला चौकट आणण्याची गरज आहे.

माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांच्यावर परमबीर यांनी १०० कोटींच्या वसुलीचा आरोप केला होता. तसे पत्र त्यांनी उद्धव ठाकरे यानाच लिहिले होते. पण आता त्यांच्याविरुद्ध कायद्याच्या ससेमिरा लागल्यानंतर परमबीर गायब झाले आहेत. तेव्हा महाविकास आघाडीकडून परमबीर कुठे गायब झालेत अशी विचारणा सातत्याने होत आहे. पण त्यांच्याच सरकारमधील माजी गृहमंत्री अनिल देशमुख हे कुठे आहेत, हे मात्र कुणीही सांगायला तयार नाही, त्याबद्दल आश्चर्य व्यक्त होत आहे. शरद पवारांनीही मध्यंतरी भाषणात परमबीर यांच्या गायब होण्याबद्दल सवाल उपस्थित केला होता, पण त्यांनीही त्यांच्याच पक्षाच्या अनिल देशमुख यांच्या ठावठिकाण्याविषयी वाच्यता केली नव्हती.

 

हे ही वाचा:

दुबई-जम्मू-काश्मीर करार हे भारतासाठी मोठे यश

दिवाळीपासून कोकण होणार ‘हाऊसफुल’

अभिनेत्याकडून चुकून गोळी सुटली आणि सिनेमॅटोग्राफरचा घेतला जीव!

होय…आर्यनला ड्रग्स पुरवले! अनन्या पांडेची कबुली

 

याच परमबीर यांनी सुशांतसिंह राजपूत प्रकरण तापलेले असताना रिपब्लिक टीव्हीच्या अर्णब गोस्वामीला टीआरपी घोटाळ्यात अडकविण्याचा प्रयत्न केला होता. तेव्हा परमबीर हे महाविकास आघाडीतील घटकपक्षांचे आवडते होते. पण आता त्यांनाच महाविकास आघाडीकडून लक्ष्य करण्यात येत आहे.

 

Exit mobile version