माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे हे चिंताग्रस्त झाले आहेत. शिवसेनेचे चिन्ह आणि नाव गेल्यानंतर आता आपलीच शिवसेना ही पहिली शिवसेना आहे, एकनाथ शिंदे यांच्यासह १६ आमदार अपात्र आहेत तसेच सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर निवडणूक आयोगाने आपला निर्णय द्यावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली आहे. या सर्व प्रकरणात आपल्या बाजूने निकाल लागणार नाही, अशी तर शंका उद्धव ठाकरे यांना येत नाही ना आणि म्हणूनच त्यांनी विशेष पत्रकार परिषद घेत निवडणूक आयोगाने सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानंतर आपला निर्णय जाहीर करावा.
उद्धव ठाकरे म्हणाले की, सर्वोच्च न्यायालयात आमदारांच्या अपात्रतेचा मुद्दा आहे. त्याची आधी सुनावणी झाली पाहिजे आणि नंतर निवडणूक आयोगाचा निर्णय लागावा. तोपर्यंत तो निर्णय लागू नये. पैशांच्या बळावर मुख्यमंत्री होणे योग्य नाही. शिवसेना ही एकच आहे. मी ती वेगळी मानत नाही. एकनाथ शिंदेंनी पक्षाचा आदेश मोडून गद्दारी केली आहे.
हे ही वाचा:
आता चिल्लर घ्यायला एटीएममध्ये जा!
नाणार होणार, ठाकरे गटाचे काय जाणार?
गल्ल्यांबद्दल कमीपणा वाटून घेण्याची गरजच नाही.
श्रद्धाच्या हाडांची पावडर करून आफताबने रस्त्यांवर विखुरली
कोंबडा आधी की अंड हा मुद्दा इथे आहे. गद्दारांनी शिवसेनेवर दावा करणे ही विकृती आहे, हे नीचपणाचे कृत्य आहे, असे मत उद्धव ठाकरे यांनी केले. ते म्हणाले की, जेव्हा पक्ष स्थापन होतो तेव्हा तो जनतेच्या बळावर स्थापन होतो. पक्ष जर निवडून आलेल्या लोकप्रतिनिधींवर अवलंबून राहणार असेल तर उद्या शिंदे गटाचे आमदार अपात्र होणार असतील तर शिंदे गटाचा पक्षावरील दावा कसा ग्राह्य मानता येईल, असे मत व्यक्त करत अपात्रतेचा निर्णय लवकर व्हावा अशी मागणी उद्धव ठाकरे यांनी केली.
उद्धव ठाकरे म्हणाले की, गेले सहा सात महिने लोक म्हणत आहेत की, शिवसेनेचे काय होणार, धनुष्यबाणाचे काय होणार पक्षाचे काय होणार त्यामुळेच आपण पत्रकार परिषद घेऊन त्यावर बोलत आहोत. येत्या १४ तारखेपासून सर्वोच्च न्यायालयाची सुनावणी होणार आहे. निवडणूक आयोगाची सुनावणी मात्र झाली आहे.