शिवसेनेचे मुखपत्र असलेला ‘सामना’ या वृत्तपत्राच्या मुख्य संपादकपदाची धुरा शिवसेना प्रमुख उद्धव ठाकरे यांच्याकडे सोपवण्यात आली आहे. यापूर्वी उद्धव ठाकरे यांच्या पत्नी रश्मी ठाकरे या सामनाच्या मुख्य संपादकपदी होत्या.
उद्धव ठाकरे हे याधीही सामनाचे मुख्य संपादक होते. पण मुख्यमंत्री झाल्यानंतर त्यांनी या पदाची जबाबदारी रश्मी ठाकरे यांच्याकडे दिली होती. मात्र आता उद्धव ठाकरे यांनी पुन्हा सामनाच्या मुख्य संपादकाची जबाबदारी घेतली आहे. तर संजय राऊत यांचे कार्यकारी संपादकपद कायम आहे. यादरम्यान, सामनाचे कार्यकारी संपादक आणि शिवसेना खासदार संजय राऊत हे पत्राचाळ गैरव्यवहारप्रकरणी ईडीच्या कोठडीत आहेत.
३१ जुलैला अनेक तासांच्या चौकशीनंतर ईडीने संजय राऊत यांना अटक केले होते. सध्या संजय राऊत हे ८ ऑगस्टपर्यंत ईडीच्या कोठडीत आहेत. अलिबाग येथील जमीन खरेदीवेळी राऊतांच्या पत्नी वर्ष राऊत यांच्या खात्यावर आलेल्या पैशांच्या संबंधात चौकशी करण्याची मागणी ईडीच्या वकिलांनी केली होती. या चौकशीसाठी ईडीने वर्षा राऊत यांना चौकशीसाठी समन्स पाठवले होते.
हे ही वाचा:
आरेमध्ये एकही झाड नव्याने तोडलेले नाही, फक्त फांद्या कापल्या आहेत
राहुल गांधी, प्रियांका गांधींना पोलिसांनी घेतलं ताब्यात
राहुल गांधी यांचे छाती पिटणे सुरूच
थायलंडमध्ये नाईट क्लबला लागलेल्या आगीत १३ जणांचा मृत्यू
दरम्यान, आज, ५ ऑगस्ट रोजी राष्ट्रवादीचे नेते जितेंद्र आव्हाड यांचा वाढदिवस आहे. यावेळी सामना वृत्तपत्राच्या पाहिल्याचं पानावर त्यांच्या वाढदिवसाची जाहिरात देण्यात आली आहे. विशेष म्हणजे, सामनाच्या इतिहासात पहिल्यांदाच दुसऱ्या पक्षाच्या नेत्याची जाहिरात पहिल्या पानावर देण्यात आली आहे.