उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ‘चिन्ह’ जाणार?

उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेचे ‘चिन्ह’ जाणार?

शिवसेनेचे मुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि पक्षातील अनेक नेत्यांनी बंड करत उद्धव ठाकरेंना राष्ट्रवादी आणि काँग्रेसची साथ सोडण्याचे आश्वासन दिले होते. मात्र तसे झाले नाही आणि महाविकास आघाडी सरकार पडले. दरम्यान, या सगळ्यात एकनाथ शिंदे यांनी पक्षाच्या धनुष्यबाण या चिन्हवर दावा केला आहे. यावरून आता उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना नवे आवाहन केले आहे. न्यायालयात काही लढा द्यायचा तो देऊच, पण दुर्दैवाने कायद्याच्या लढाईत अपयश आले तरी गाफील न राहता शिवसेनेला जे काही नवे चिन्ह मिळेल ते कमी अवधीत घरोघरी पोहोचविण्यासाठी कंबर कसा, असे आवाहन शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी पक्षाच्या पदाधिकाऱ्यांना केले आहे.

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या बंडानंतर उद्धव ठाकरेंच्या शिवसेनेने एकनाथ शिंदे यांच्या सोळा आमदारांवर अपात्रतेची कारवाई करण्याची मागणी केली होती. या कारवाईला एकनाथ शिंदे यांच्या शिवसेनेने सर्वोच्च न्यायालयात आव्हान दिले असून याचिकेवर ११ जुलै रोजी सुनावणी होणार आहे. या सुनावणीत शिवसेना नेमकी कुणाची याची सुनावणी होणार आहे. त्याआधीच उद्धव ठाकरे यांनी पदाधिकाऱ्यांना आवाहन करण्यास सुरुवात केली आहे.

हे ही वाचा:

पंतप्रधान मोदींच्या हस्ते वाराणसीमध्ये १ हजार ७०० कोटी रुपयांच्या प्रकल्पांचे उद्घाटन

एकनाथ शिंदे यांनी मुख्यमंत्री पदाचा पदभार स्वीकारला

पोलिसांनी तेलंगातील तीन पीएफआय कार्यकर्त्यांना केली अटक

उद्धव ठाकरेंना भेटायला आलेल्या शिवसैनिकाचा ह्रदयविकाराच्या धक्क्याने मृत्यू

मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना शिवसेनेचा वाढत पाठींबा पाहून उद्धव ठाकरेंनी असे आवाहन केल्याचे म्हटले जात आहे. एकनाथ शिंदे यांना ४० शिवसेना आमदारांचा आणि अपक्ष आमदारांचा पाठींबा आहे. तसेच नगरपालिकांमधील नगरसेवकही हळूहळू एकनाथ शिंदे यांना पाठींबा देत आहेत.

Exit mobile version