मराठा आरक्षण आणि ओबीसीच्या आरक्षणाचा वाद दिवसेंदिवस वाढत चालला आहे. एकीकडे मराठा आंदोलक मनोज जरांगे यांनी आपले उपोषण मागे घेऊन सरकारशी चर्चा करण्यास सहमती दर्शविली. तर दुसरीकडे सरकारने ओबीसी आरक्षणाला धक्का लावू नये याकरिता दोन ओबीसी नेत्यांनी उपोषणाला सुरुवात केली. यावरून राज्यसरकार तोडगा काढण्याचा प्रयत्न करत आहेत. परंतु, विरोधक सरकार टीका आणि आरोप करत आहे.
दोन्ही समाजाच्या आरक्षणाबाबत केंद्र सरकारने बघ्याची भूमिका घेणं हे चालणार नाही, असे शरद पवार यांनी म्हटले आहे. यावर भाजप नेते बावनकुळे यांनी उत्तर दिल आहे. ते म्हणाले, शरद पवार आणि उद्धव ठाकरे यांनी मुखमंत्री असताना त्यांनी मराठा आरक्षण रद्द केलं. मराठा आरक्षणाचे मारेकरी कोण असतील तर ते उद्धव ठाकरे आणि शरद पवार आहेत, अशी जोरदार टीका बावनकुळे यांनी केली आहे.
नागपूरमध्ये प्रसार माध्यमांशी संवाद साधताना चंद्रशेखर बावनकुळे म्हणाले की, मराठा आणि ओबीसी आरक्षणामध्ये केंद्र सरकराचा काहीही संबंध नसून राज्य सरकार यावर निर्णय घेत असतो. शरद पवार इतक्या वेळा सत्तेमध्ये होते, शरद पवार यांची नेहमी भूमिका मराठा आरक्षणाविरोधी असायची आणि हे सर्व लपून नाहीये आपण हवे तर त्यांच्या काळातील जीआर काढून पाहावेत.
हे ही वाचा..
बँक फसवणूक केल्याचा आरोप असलेल्या अमटेक कंपनीसंबंधित ३५ ठिकाणांवर छापेमारी
‘अकबरनगर घेतय मोकळा श्वास, बेकायदेशीर मशिदी जमीनदोस्त’!
बिहार सरकारला न्यायालयाचा झटका !
नाटकात प्रभू श्रीराम, सीतामातेचा अपमान करणाऱ्या विद्यार्थ्यांना १.२ लाखांचा दंड
ते पुढे म्हणाले, त्यांच्या काळात मराठा समाजाला आरक्षण देता आले असते, सवलती देता आल्या असत्या परंतु पवारांनी कोणतीही भूमिका घेतली नाही आणि आरक्षणावर आता बोलणे म्हणजे आश्चर्याची बाब आहे. उद्धव ठाकरे मुखमंत्री असताना योग्य केस लढता आली नाही, योग्य वकील लागता आला नाही, त्यांच्यामुळेच आरक्षण गेलं. महायुती सरकारने आरक्षण दिल आणि आता कुठल्या अधिकाऱ्याने हे बोंबा मारत आहेत. मराठा आरक्षणाचे मारेकरी जर कोण असतील तर ते शरद पवार आणि उद्धव ठाकरे आहेत, असे बावनकुळे म्हणाले.