समसमान वाटप म्हणजेच मुख्यमंत्रीपदाचे वाटप असा उद्धव ठाकरेंनी काढला अर्थ!

अमित शहांनी दिलेल्या कथित वचनावर मुलाखतीत व्यक्त केले मत

समसमान वाटप म्हणजेच मुख्यमंत्रीपदाचे वाटप असा उद्धव ठाकरेंनी काढला अर्थ!

अमित शहा यांनी बाळासाहेब ठाकरे यांच्या खोलीत दिलेल्या वचनाची चर्चा गेल्या काही वर्षांपासून सुरू आहे. त्यावर उद्धव ठाकरे यांनी आपले मत व्यक्त केले. त्यात प्रत्यक्षात अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद वाटून घ्यायचे असे वचन अमित शहांनी दिल्याचा उल्लेख त्यांनी केला नाही, पण पद आणि जबाबदाऱ्यांचे समसमान वाटप करायचे असे अमित शहांनी जाहीर केले होते. त्याचा अर्थ मुख्यमंत्रीपदाचे वाटप अर्धेअर्धे करायचे असा अर्थ उद्धव ठाकरे यांनी काढला.

उद्धव ठाकरे यांची टीव्ही ९ या वाहिनीवर मुलाखत झाली. त्यावेळी हा मुद्दा उपस्थित झाला. तेव्हा उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांची प्रकृती तेव्हा ठीक नव्हती. तब्येत खालावली होती. मी त्यांचा हात हातात घेऊन त्यांना वचन दिले की, मी शिवसैनिकाला मुख्यमंत्री करेन. शिवसेनेला पुढे नेईन.

उद्धव ठाकरे पुढे म्हणतात की, त्यानंतर भाजपाचे नेते अमित शहा यांच्यासह आपली बैठक झाली. तेव्हा अमित शहा म्हणाले की, ज्यांच्या जास्त जागा येतील, त्यांचा मुख्यमंत्री. तेव्हा मी त्यांना म्हटले की, असे नको. त्यामुळे पाडापाडी होईल. त्यापेक्षा अडीच अडीच वर्षे मुख्यमंत्रीपद विभागून घेऊ. तसे पत्र तयार करू. त्यात हे जे ठरले ते लिहू आणि मंत्रालयावर ते चिकटवू.

हे ही वाचा:

“नरेंद्र मोदींना पुन्हा पंतप्रधान बनवा; गोहत्या करणाऱ्यांना उलटे लटकवू”

नांदेडमध्ये प्रसादातून ९० जणांना विषबाधा!

चिमुकल्या मोदी, योगींची हवा, पंतप्रधान मोदींनी भाषण थांबवले

‘तर ईडी मनी लाँड्रिंग प्रकरणात आरोपींना अटक करू शकत नाही’

उद्धव ठाकरे म्हणाले की, तेव्हा एक दोन महिने लोकसभा निवडणुकीसाठी आणि विधानसभा निवडणुकीसाठी ३-४ महिने शिल्लक होते. तेव्हा मुख्यमंत्रीपद जाहीर करण्याची आवश्यकता नव्हती. अमित शहांनी पत्रकार परिषदेत सांगितले की, पद जबाबादाऱ्या यांचे समसमान वाटप होईल. त्यामुळे यात मुख्यमंत्रीपद येतं. समसमान याचा अर्थ ज्याला कळतो त्याला तो कळला.

उद्धव ठाकरे यांनी हा घटनाक्रम सांगितला त्यात कुठेही अमित शहांनी अडीच अडीच वर्षे आपण मुख्यमंत्रीपद विभागून घेऊ असे ठामपणे वचन दिल्याचा उल्लेख केला नाही.

यानंतर प्रत्यक्ष विधानसभा निवडणुकीनंतर उद्धव ठाकरे यांनी मुख्यमंत्रीपद स्वीकारले तेव्हा काँग्रेस आणि राष्ट्रवादीसोबत जाण्याचा निर्णय त्यांनी घेतला. हे पाऊल उचलताना आपल्याला अमित शहांनी जो शब्द दिला होता तो पाळला नाही, असे सांगत उद्धव ठाकरेंनी काँग्रेस राष्ट्रवादीसोबत जात महाविकास आघाडीचे मुख्यमंत्री बनण्याच्या आपल्या भूमिकेचे समर्थन केले होते.

 

Exit mobile version