उद्धव ठाकरे यांनी सोडले जुनेच बाण!

बीकेसीमधील सभेत पुन्हा त्याच मुद्द्यांचा उल्लेख

उद्धव ठाकरे यांनी सोडले जुनेच बाण!

आपण बारसू येथे होणाऱ्या रिफायनरीविरोधातील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी आणि त्या आंदोलकांना भेटण्यासाठी ६ मे रोजी जाणार आहोत, याची घोषणा वगळता उद्धव ठाकरे यांनी नेहमीच्याच मुद्द्यांना बीकेसीच्या सभेत हात घातला.
उद्धव ठाकरेंच्या या सभेत विरोधकांवर नवे टीकास्त्र सोडतील अशी चर्चा होती पण पुन्हा एकदा त्याच मुद्द्यांवर उद्धव ठाकरे घसरले.

मिंधे सरकार, गद्दारी, महाराष्ट्राची संस्कृती, मुंबईचा लचका, महाराष्ट्राची लूट, बापाची चोरी, अदानींची चौकशी, सत्यपाल मलिकांचे सत्य, कुरतडलेला देश, निरुपयोगी बुलेट ट्रेन, उद्योग चोरले या जुन्याच शब्दप्रयोगांचा पुन्हा वापर करत उद्धव ठाकरे यांनी राज्यातील एकनाथ शिंदे आणि देवेंद्र फडणवीस सरकारवरील संतापाला त्यांनी पुन्हा वाट मोकळी करून दिली.

उद्धव ठाकरेंच्या भाषणाची सुरुवात टोमण्याने झाली. महाराष्ट्र दिनाच्या निमित्ताने हुतात्मा चौकात आम्हीच सगळी सजावट केल्याचा टोमणा लगावत उद्धव ठाकरे यांनी राज्य सरकारला लक्ष्य केले. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी त्यांना काँग्रेसच्या वतीने कशा सातत्याने शिव्या दिल्या जातात असे म्हटले होते, त्याचा आधार घेत आम्हालाही लोक बोलतात म्हणून आम्हीही बोलणार असा पवित्रा घेतला.

हे ही वाचा:

मशीद बंदर परिसरातील मिनारा मशिदीजवळ लागली आग

डोंबिवलीतल्या कैवल्यवारीत ‘अवघा रंग एक झाला’

गुजराती बिल्डर चालतो, गृहमंत्री गुजराती नको…

देशद्रोह कायद्याला आव्हान देणाऱ्या याचिकेवरील सुनावणी पुढे ढकलली

संयुक्त महाराष्ट्राच्या लढ्याचा उल्लेख करताना ती जिद्द एकनाथ शिंदे यांच्या बेकायदा सरकारने दाखवावी असा सल्ला देण्याचा प्रयत्न त्यांनी केला. उद्धव ठाकरे यांनी महाविकास आघाडी कशी एकत्र आहे, याचा दाखला देण्यासाठी निवडक निवडणुकांचा उल्लेख केला. त्यात कसबा, बाजारसमित्या आणि अंधेरीच्या निवडणुकांचा समावेश होता.

राममंदिराचा लढा कसा शिवसेनेने दिला, उद्योग कसे महाराष्ट्राबाहेर गेले या मुद्द्यांचा उल्लेख करत उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेबद्दलची चरफड पुन्हा एकदा व्यक्त केली. अदानींना आपण गुन्हेगार मानत नाही पण त्यांनी एवढी प्रगती कशी केली त्यांचे चरित्र वाचायला द्या असे म्हणते अदानींवरचा रागही त्यांनी आळवला. सत्यपाल मलिकांची मुलाखत, बुलेट ट्रेनचा प्रकल्प यावरही त्यांनी तोंडसुख घेतले.

Exit mobile version