मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी फेसबुक लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला तेव्हा ते राजीनाम्याची घोषणा करणार का याविषयी तर्कवितर्क लढविले जात होते, पण प्रत्यक्षात मुख्यमंत्र्यांनी तूर्तास आपण खुर्ची सोडणार नाही, अशीच भूमिका घेतल्याचे दिसले. जे आमदार बाहेर पडले आहेत त्यांनी आपल्याला राजीनामा देण्यास सांगितले तर आपण देऊ असे मुख्यमंत्री म्हणाले.
शरद पवारांच्या आग्रहाखातर मी मुख्यमंत्री झालो. कोणताही अनुभव नसताना मला मुख्यमंत्री पदी बसवण्यात आलं, असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे म्हणाले. राज्यातल्या राजकीय घडामोडींवर बोलताना उद्धव ठाकरे म्हणाले की, माझ्याच लोकांना मी मुख्यमंत्री पद नको असेल तर त्यांनी समोर येऊन सांगाव. त्यांनी समोरून येऊन सांगितलं तर मी राजीनामा द्यायला तयार आहे. राजीनाम्याचे पत्र लिहून ठेवतो, असे उद्धव ठाकरे म्हणाले. आजच मी ‘वर्षा’तला मुक्काम ‘मातोश्री’वर हलवतो, असेही मुख्यमंत्री म्हणाले.
शिवसेना पक्षप्रमुख पदीही मी मान्य नसेल तर शिवसैनिकांनी समोर येऊन सांगाव ते पदही मी सोडायला तयार आहे. विरोधकांनी सांगितल्यावर पद सोडणार नाही. पण समोर बसून त्यांनी बोलावं, असे मुख्यमंत्री म्हणाले.
मुख्यमंत्री जनतेला, आमदारांना भेटत नव्हते, अशा तक्रारी होत्या. हे काही महिन्यांपूर्वी सत्य होते. शस्त्रक्रियेमुळे भेटणं शक्य नव्हते. मात्र, ऑनलाईन काम सुरू होते. आता भेटायला सुरुवात केली आहे, असे मुख्यमंत्री म्हणाले.
हे ही वाचा:
संजय राऊत यांनी सांगितले, सरकारचा कारभार आटोपला
‘जास्तीत जास्त काय होईल सत्ता जाईल’
‘जास्तीत जास्त काय होईल सत्ता जाईल’
राज्यपाल कोश्यारी यांना कोरोनाची लागण
बाळासाहेबांची शिवसेना आता राहिलेलं नाही, अशी टीका होत असते यावर भाष्य करताना उद्धव ठाकरे म्हणाले की, शिवसेना आणि हिंदुत्व हे घट्ट जोडलेले आहेत. हिंदुत्व हा आपला श्वास आहे, असा कानमंत्र पक्षप्रमुखांनी दिलेला आहे. बाळासाहेबांचे विचारच पुढे नेत आहे. बाळासाहेब गेल्यानंतरच्या म्हणजेच मधल्या वेळेत मिळालं ते बाळासाहेबांच्या नंतरच्या शिवसेनेने दिलेलं आहे हे त्यांनी लक्षात ठेवावं, असं उद्धव ठाकरे म्हणाले. शिवसेना ही बाळासाहेबांची शिवसेना राहिलेली नाही हे भासवण्याचा प्रयत्न होतोय, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली आहे.