राज्याच्या राजकारणात मोठ्या हालचाली सुरू होत्या अखेर या राजकीय नाट्यावर पडदा पडला आहे. मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज लाइव्हच्या माध्यमातून संवाद साधला. यावेळी उद्धव ठाकरे यांनी मी माझ्या पदाचा त्याग करतो, असं म्हणत मुख्यमंत्री पदाचा राजीनामा दिला आहे. शिवाय विधान परिषद सदस्यत्वाचाही राजीनामा देत असल्याची घोषणा केली.
सर्वोच्च न्यायालयाने नुकताच उद्या महाविकास आघाडी सरकारला बहुमत सिद्ध करावं लागेल असा आदेश दिला आणि मुख्यमंत्र्यांनी लाइव्हच्या माध्यमातून आपल्या मुख्यमंत्रीपदाचा राजीनामा दिला आहे. “मला मुख्यमंत्री पद सोडण्याची खंत अजिबात नाही,” असं म्हणत मुख्यमंत्र्यांनी राजीनामा दिला.
हे ही वाचा:
न्यायालयाची आणखी एक थप्पड, बहुमत चाचणी उद्याच घेण्याचे आदेश
“मदरशांमध्ये धर्माविषयी निंदा करणाऱ्यांचा शिरच्छेद करायला शिकवले जाते”
“उदयपूर हत्या घटनेनंतर स्वा. सावरकरांचे विचार आठवतात”
बहुमत चाचणीत मनसेचा भाजपाला पाठिंबा
“आज मला विशेषतः शरद पवार आणि सोनिया गांधी आणि सहकाऱ्यांना धन्यवाद द्यायचे आहेत. आज निर्णय घेताना फक्त चार शिवसेनेचे मंत्री होते. या निर्णयाला कोणी विरोध केला नाही, सर्वांनी मान्यता दिली. ज्यांचा विरोध आहे हे भासवलं जात होतं त्यांनी पाठिंबा दिला,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.