उद्धव ठाकरेंची चिडचिड; अटल सेतू बांधला पण अटलजींचा फोटो कुठे होता?

राम मंदिराबाबतही लावला चिडका सूर

उद्धव ठाकरेंची चिडचिड; अटल सेतू बांधला पण  अटलजींचा फोटो कुठे होता?

ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी ‘मातोश्री’ येथे पत्रकार परिषद घेत पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या यशस्वी महाराष्ट्र दौऱ्याविषयीची जळजळ व्यक्त केली. पंतप्रधान नरेंद्र मोदींनी दौऱ्यावेळी पुन्हा एकदा घराणेशाही या मुद्द्यावरून विरोधकांवर जोरदार निशाणा साधला. हा निशाणा उद्धव ठाकरेंच्या वर्मावर लागल्याचं पहायाला मिळालं. याविषयी बोलताना त्यांनी सांगितलं की, २२ जानेवारीला नाशिक येथील काळाराम मंदिरात ते दर्शन घेणार असून गोदावरी तीरी आरती करणार आहेत.

नरेंद्र मोदींनी महाराष्ट्र दौऱ्यावर असताना घराणेशाहीवरही भाष्य केलं होतं. त्यावर उद्धव ठाकरे म्हणाले की, “कल्याण लोकसभा मतदारसंघात जाणार आहे. तिथे गद्दारांची घराणेशाही आहे. त्यावर नरेंद्र मोदी बोलले नाहीत. ही घराणेशाही त्यांना चालते का? गद्दारांची घराणेशाही त्यांना प्राणप्रीय आहे. हा सगळा बोगसपणा आहे. पण घराणेशाहीवर घरंदाज माणसाने बोललेलं बरं,” असं म्हणत त्यांनी मनातील खदखद बोलून दाखविली.

“मी अयोध्येत शिवजन्मभूमीची माती घेऊन गेलो होतो. त्यानंतर एक वर्षाच्या आत न्यायालायचा निकाल आला. कारसेवक नसते तर मंदिर झालं नसतं. कारसेवकांचा हा गौरव आहे. झेंडे लावयला अनेक येतात पण लढण्याची वेळ आली तेव्हा कोणीही नव्हत. राम मंदिर कुणाची खासगी मालमत्ता नाही. मनात येईल तेव्हा अयोध्येत जाणार,” असे उद्धव ठाकरे म्हणाले. “अटल सेतूचे उद्घाटन झाले पण अटलजींचा फोटो कुठे होता? राम मंदिर बांधलं पण त्यात कृपया स्वतःची नाही तर रामाची मूर्ती लावावी,” असं बोलत उद्धव ठाकरेंनी पुन्हा एकदा राम मंदिराबाबत चिडका सूर लावला.

“आम्हाला असं वाटतं २२ तारखेला अयोध्येत प्रभूराम मंदिराचं लोकार्पण होणार आहे. रामचंद्र एकटे नसतात. त्यांच्यासोबत लक्ष्मण आणि सिता, हनुमान असतात. ही प्राणप्रतिष्ठा फक्त रामाची नाही तर राष्ट्राची आहे. ज्याप्रमाणे बाबरी बांधली तसेच सोमनाथ मंदिराचा देखील विधंस्व झाला होता. सरदार वल्लभ भाई पटेल यांनी पुढाकार घेतला आणि मंदिर पुन्हा बांधल. मात्र लोकार्पण झाल तेव्हा सरदार वल्लभ भाई पटेल नव्हते. त्यांचे निधन झाले होते. सोमनाथ मंदिर आणि लोकार्पणला तेव्हाचे राष्ट्रपती राजेंद्र प्रसाद यांना निमंत्रण देण्यात आले होते. त्यांच्याहस्ते प्राणप्रिष्ठा झाली होती,” असं उद्धव ठाकरे म्हणाले.

हे ही वाचा:

संगीत विश्वातला तारा निखळला; ज्येष्ठ शास्त्रीय गायिका प्रभा अत्रे यांचे निधन

इंडिया गटाच्या बैठकीत ममता बॅनर्जी सहभागी होणार नाहीत

निवृत्त होईपर्यंत आठवड्याला ८० ते ९० तास काम करायचे नारायणमूर्ती

जय श्रीराम: रामलल्लांच्या प्राणप्रतिष्ठेसाठी बोलावणार हुतात्मा कारसेवकांच्या कुटुंबियांना

काळाराम मंदिरात दर्शन सोहळ्याचे निमंत्रण राष्ट्रपती द्रोपदी मूर्म यांनाही देणार असल्याचे म्हणत त्यांनी पत्रही दाखवले. “मी देशभक्त आहे अंधभक्त नाही. मी कडवट हिंदुत्ववादी आहे, राम मंदिरासाठी शिवसेनेचं योगदान सर्वांना माहिती आहे. २२ जानेवारीला दिवाळी नक्की साजरी करा पण केंद्र सरकारने देशाचं दिवाळं काढलं त्याची देखील चर्चा व्हायला हवी,” अशी टीका यावेळी उद्धव ठाकरेंनी केली.

Exit mobile version