स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या आत्मार्पण दिनानिमित्त २६ फेब्रुवारी रोजी देशाने स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली वाहिली आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी या महत्त्वाच्या दिवशी स्वातंत्र्यवीर सावरकर यांना आदरांजली वाहिलेली नाही. देशातील अनेक नेत्यांनी सावरकर यांना आदरांजली वाहिली आहे. मात्र, मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्याकडून कोणतेही ट्विट वा संदेश आलेला नाही.
हिंदुत्वाचा नारा देणाऱ्या मुख्यमंत्र्यांना काही दिवसांपूर्वीच १९ फेब्रुवारी रोजी शिवजयंतीच्या दिवशीही अशीच उशिराने जाग आली होती. त्यांनी छत्रपती शिवाजी महाराज यांना अभिवादन करणारी पोस्ट दुपारी उशिराने शेअर केली होती. त्यामुळे विरोधकांनी आणि समाज माध्यम वापरकर्त्यांनी मुख्यमंत्र्यांना चांगलेच ट्रोल केले होते.
यापूर्वी स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त देखील मुख्यमंत्र्यांच्या दौऱ्यात ते साडे बारा वाजता स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या जयंतीनिमित्त त्यांच्या प्रतिमेस पुष्पहार घालून अभिवादन करणार असल्याचे म्हटले होते. त्यामुळे त्यांना उशिराने जाग आल्याचे म्हणत विरोधकांनी उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला होता.
महाविकास आघाडीत असेपर्यंत शिवसेनेचं मतपरिवर्तन होऊ शकत नाही. एकमेकांच्या निष्ठा दुखवायच्या नाहीत हे त्यांनी ठरवलं आहे. त्यामुळे टिपू सुलतानची जयंती साजरी केलेली चालते त्यांना, असा टोला चंद्रकांत पाटील यांनी आज शिवसेनेला लगावला आहे.
हे ही वाचा:
कोर्टाने लिएंडर पेसला कौटुंबिक हिंसाचारात ठरवले दोषी
रशिया – युक्रेन युद्धात युक्रेनची पहिली महिला पायलट ठार
मराठा आरक्षणासाठी संभाजी राजे यांचे आझाद मैदानात उपोषण
युक्रेन हल्ल्याचा निषेध करणाऱ्या ठरावावर भारत तटस्थ
कालपरवापर्यंत वीर सावरकरांचा ज्यांना जाज्ज्वल्य अभिमान होता, सावरकरांना भारतरत्न द्या म्हणत होते. त्यांची अवस्था अशी आहे की त्यांच्या मांडीला मांडी लावून जे बसले आहेत, ते सावरकरांवर रोज लाच्छंन लावत आहेत पण हे गप्प आहेत, अशा शब्दांमध्ये विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी शिवसेनेवर टीकास्त्र सोडले होते.