ठाकरे गटाचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी दैनिक ‘सामना’साठी मुलाखत देत हिंदुत्वाच्या मुद्द्यावरून भाजपावर निशाणा साधला. भाजपाचे हिंदुत्व तपासण्याची वेळ आली आहे, अशी टीका उद्धव ठाकरेंनी केली. शिवाय मोदी सरकारने नऊ वर्षात काय केलं? असा सवालही उद्धव ठाकरेंनी उपस्थित केला. यानंतर भाजपाचे प्रदेशाध्यक्ष चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर सडकून टीका केली आहे.
उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवलं. अडीच वर्षांत अडीच दिवसही ज्यांना मंत्रालयात जावं वाटलं नाही ते उद्धव ठाकरे मोदीजींनी नऊ वर्षांत काय केलं? असा प्रश्न विचारत आहेत. बहुधा उद्धव ठाकरेंना अल्झायमरचा आजार झाला आहे. कारण २०१९ च्या निवडणुकीत नरेंद्र मोदींच्या कर्तृत्वावर उद्धव ठाकरेंनी शेकडो भाषणं केली आणि जिंकून आले, अशी घाणाघाती टीका बावनकुळे यांनी केली आहे. तसेच उद्धव ठाकरे यांनी चांगल्या न्यूरो सर्जनला भेटून उपचार घ्यावेत असा खोचक सल्लाही दिला आहे.
उद्धव ठाकरेंनी महायुतीच्या जागा वाटपाची चिंता करण्याची गरज नसून त्यांची शिल्लक सेना तरी निवडणुकीपर्यंत त्यांच्यासोबत राहते का? याकडे लक्ष द्यायला हवे, असा निशाणा चंद्रशेखर बावनकुळे यांनी साधला. आत्मनिर्भर भारतासाठी महायुती झाली आहे. पण, महाविकास आघाडी ही सत्ता आणि पैसा मिळवण्यासाठी झाली. महाविकास आघाडीत मुख्यमंत्रीपदासाठी पाच दावेदार बाशिंग बांधून बसले आहेत. त्यात उद्धव ठाकरेही बोहल्यावर बसण्यासाठी उत्सुक आहेत. पण, २०२४ साली जनता उद्धव ठाकरेंना त्यांच्या आवडीचे काम देणार आहे आणि ते म्हणजे घरी बसण्याचे, अशी सडकून टीका बावनकुळे यांनी केली.
उद्धव ठाकरे यांनी अडीच वर्षे घरात बसून फेसबुक लाईव्हच्या माध्यमातून सरकार चालवलं. अडीच वर्षांत अडीच दिवसही ज्यांना मंत्रालयात जावं वाटलं नाही ते उद्धव ठाकरे मोदीजींनी नऊ वर्षांत काय केलं ? असा प्रश्न विचारत आहेत. बहुधा तुम्हाला अल्झायमरचा आजार झाला आहे. कारण 2019 च्या निवडणुकीत…
— Chandrashekhar Bawankule (@cbawankule) July 27, 2023
हे ही वाचा:
उद्धव ठाकरेंना अजूनही प्रश्न; हिंदुत्व सोडलं म्हणजे काय?
मणिपूरमध्ये पुन्हा हिंसाचार उसळला; ३० घरे पेटवली
राहुल गांधी यांनीच मणिपूरमध्ये आग लावली!
काँग्रेसचे माजी खासदार विजय दर्डा यांना कोळसा घोटाळा प्रकरणात चार वर्षांचा तुरुंगवास
३० वर्षे मुंबई महापालिकेत सत्ता मिळवून मुंबईची ज्यांनी लूट केली आणि मुंबईतील मराठी माणसाला विकासापासून दूर ठेवलं. ते उद्धव ठाकरे आज मुंबईची चिंता करत आहेत. मुंबईवरील ठाकरेंचे बेगडी प्रेम ऊतू जात आहे. मुंबई तोडणार असं सांगून तुम्ही मुंबईकरांची दिशाभूल करत आहात. मुंबई महाराष्ट्रापासून कुणीही तोडणार नाही पण येत्या निवडणुकीत तुमच्या भ्रष्ट कारभारातून मात्र मुंबई नक्की मुक्त होईल, अशी टीका चंद्रशेखर बावनकुळे यांनी उद्धव ठाकरेंवर केली.