ठाकरे, पवारांना निमंत्रण, केजरीवाल, केसीआरवर फुली

कर्नाटकचे मुख्यमंत्री म्हणून सिद्धरामय्या शपथ घेणार

ठाकरे, पवारांना निमंत्रण, केजरीवाल, केसीआरवर फुली

कर्नाटकमध्ये ऐतिहासिक विजय मिळवल्यानंतर आता काँग्रेसने मोठ्या थाटामाटात शपथविधी सोहळा आयोजित करण्याचे ठरविले आहे. २० मे रोजी होणाऱ्या या सोहळ्यात देशभरातील तमाम नेत्यांना आमंत्रित केले जात आहे. मात्र दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल आणि तेलंगणाचे मुख्यमंत्री केसीआर यांना काँग्रेसने आमंत्रण पाठविलेले नाही. दिग्गज नेते शरद पवार, माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना या शपथविधीसाठी आमंत्रण दिले आहे.

कर्नाटकच्या मुख्यमंत्रिपदी सिद्धारमय्या यांच्या नावावर शिक्कामोर्तबल झाल्यानंतर डी. के. शिवकुमार यांचे उपमुख्यमंत्रिपदासाठी मन वळवण्यात काँग्रेस यशस्वी झाली आहे. शिवकुमार हे लोकसभा निवडणुकीपर्यंत कर्नाटकचे काँग्रेस प्रदेशाध्यक्षही राहतील. त्यामुळे आता काँग्रेसचे सर्व नेते शपथविधी सोहळ्याच्या तयारीला लागले आहेत.

आमंत्रितांची यादीही तयार करण्यात आली आहे. या यादीत बिहारचे मुख्यमंत्री नीतीश कुमार, बिहारचे उपमुख्यमंत्री तेजस्वी यादव, तमिळनाडूचे मुख्यमंत्री एम. के. स्टॅलिन, झारखंडचे मुख्यमंत्री हेमंत सोरेन, पीडीपीच्या प्रमुख मेहबुबा मुफ्ती, सीपीआयचे सरचिटणीस डी. राजा, माकपचे सरचिटणीस सीताराम येचुरी, प. बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी,  अभिनेते कमला हासन यांनाही आमंत्रित करण्यात आले आहे.

हे ही वाचा:

वाघ, वाजे, वज्रमुठीवरू न फडणवीसांची टोलेबाजी

उद्धव ठाकरेंचे व्यक्तिगत चांगले संबंध किती जणांशी? बुरे दिन यालाच म्हणतात..

रफाएल नदाल पुढील वर्षी करणार टेनिसला अलविदा

त्या २६ मुलींचे आयुष्य ‘द केरळ स्टोरी’सारखेच

 

त्याचवेळी केरळचे मुख्यमंत्री पिनाराई विजयन, दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री जगमोहन रेड्डी आणि तेलंगाणाचे मुख्यमंत्री केसीआर यांना या शपथविधी सोहळ्याचे आमंत्रण दिले गेलेले नाही.

कोण आहेत सिद्धारमय्या?

कर्नाटकच्या म्हैसूर जिल्ह्यातील वरुणा होबलीमधील एका गरीब शेतकरी कुटुंबात १२ ऑगस्ट १९४८ रोजी सिद्धारमय्या यांचा जन्म झाला. त्यांचे बालपण गरिबीत गेले. त्यांना शिक्षण अर्धवट सोडून गुरे चारावे लागले होते. नंतर त्यांनी पुन्हा शिक्षणाची गाडी पकडून बीएससीपर्यंत शिक्षण पूर्ण केले. ते १९७८मध्ये तालुका विकास मंडळाचे सदस्य झाले. त्यांनी १९८०मध्ये लोकसभा निवडणूक लढविली, मात्र त्यावेळी त्यांना पराभव पत्करावा लागला. १९८३मध्ये लोकदलाच्या तिकिटावर त्यांनी चांमुडेश्वरी विधानसभा मतदारसंघातून निवडणूक लढवली. येथे विजय मिळाल्यानंतर त्यांच्य राजकीय कारकिर्दीने वेग घेतला.

Exit mobile version