स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल राहुल गांधी यांचे मत चूकच आहे. मी त्यांच्या वक्तव्याशी सहमत नाही. आमच्या मनात सावरकरांप्रती आदर आणि निष्ठा आहेत. ज्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी त्याग केला. ते स्वातंत्र्य अबाधित राखण्यासाठी काँग्रेसच काय, सगळ्या समविचारी पक्षांसोबत आम्ही जाऊ, असे विधान उद्धव ठाकरे यांनी केले. शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या १०व्या स्मृतिदिनाच्या निमित्त आयोजित एका कार्यक्रमात ते बोलत होते.
काँग्रेस नेते राहुल गांधी यांनी महाराष्ट्रातील आपल्या पदयात्रेच्या टप्प्यात सावरकरांवर टीका केली. सावरकरांनी इंग्रजांची माफी मागितली, त्यांनी पेन्शन घेतले असे आरोप त्यांनी पुन्हा एकदा केले. त्यावर उद्धव ठाकरे यांना प्रश्न विचारल्यावर त्यांनी उपरोक्त उत्तर दिले. त्यांनी थेट राहुल गांधी यांना लक्ष्य करण्यापेक्षा भाजपावर टीका केली. पीडीपीसोबत तुम्ही मांडीला मांडी लावून बसला होतात ते कसे काय. भूमिकांबद्दल विचारण्याआधी तुमचे स्वातंत्र्यचळवळीतील योगदान सांगा. ते स्वातंत्र्य धोक्यात येत आहे. गुलामगिरीकडे वाटचाल होत आहे. आंबेडकरांनी लिहिलेली घटना टिकेल की नाही माहीत नाही. त्यामुळे जे जे एकत्र यायला हवेत त्यांनी एकत्र यायला हवे, असा अजब तर्क उद्धव ठाकरे यांनी काढला.
हे ही वाचा:
‘राहुल गांधी हा मनोरुग्ण, सावरकर समजण्याइतकी अक्कल या माणसामध्ये नाही’
रणजित सावरकर राहुल गांधींविरोधात तक्रार करणार
धारावीत बाळासाहेब ठाकरे दवाखाना
श्रद्धाच्या हत्येप्रकरणी दिल्ली पोलिस करणार आफताबची नार्को टेस्ट
राहुल गांधी यांच्यावर टीका करण्यापेक्षा उद्धव ठाकरे यांनी भाजपा, आरएसएस यांच्यावरच शरसंधान केले. ते म्हणाले की, स्वातंत्र्यवीर सावरकरांबद्दल आमच्या मनात आदर, श्रद्धा, प्रेम आहे पण त्याचबरोबरीने कुणी हा प्रश्न विचारावा ज्यांचा स्वातंत्र्य चळवळीशी संबंधही नव्हता. ज्यांना येत्या काळात १०० वर्षे होणार, त्या आरएसएस तेव्हा होता पण स्वातंत्र्यलढयापासून चार हात लांब होता त्यांनी सावरकरांबद्दल बोलू नये. पण त्या स्वातंत्र्यासाठी त्यांनी त्याग केला. ते स्वातंत्र्य आता धोक्यात आल्यामुळे आम्ही एकत्र आलो आहेत. राहुल गांधी यांच्यावर टीका करण्याऐवजी उद्धव ठाकरेंनी मुद्दा भारतरत्न पुरस्काराकडे वळविला. ते म्हणाले, ८ वर्षे होऊन गेली भारतरत्न देण्याचा अधिकार केंद्राचा आहे. सावरकरांना भारतरत्न का दिले नाही. तुम्ही प्रथम वागायला शिका सावरकरांप्रमाणे. पाकिस्तान घ्यायचा भाग मुद्दा वेगळा पाकव्याप्त काश्मीरमधईल एक इंच जमीन आणलेली नाही.