मराठमोळ्या अजिंक्यच्या स्वागताकडे ठाकरे सरकारची पाठ

मराठमोळ्या अजिंक्यच्या स्वागताकडे ठाकरे सरकारची पाठ

Mumbai: Maharashtra Environment Minister Aaditya Thackeray during the 15th edition of the India Business Leader Awards in Mumbai on Feb 28, 2020. (Photo: IANS)

ऑस्ट्रेलियन संघाला धोबी पछाड देणाऱ्या भारतीय क्रिकेट संघाचा मराठमोळा सेनापती अजिंक्य रहाणेवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. पण जन्मभुमी महाराष्ट्रात मात्र त्याला सरकारी अनास्थेचा अनुभव आला आहे. गुरुवारी मुंबई विमानतळावर दाखल झालेल्या रहाणेच्या स्वागताला महाराष्ट्र सरकारचा एकही प्रतिनिधी नव्हता.

ऑस्ट्रेलियात जाऊन ऐतिहासिक कामगिरी करणारे भारतीय क्रिकेट संघाचे शिलेदार गुरुवारी २१ तारखेला मायदेशी परतले. या कामगिरीत भारतीय संघाचे नेतृत्व करणारा मराठमोळा कर्णधार अजिंक्य रहाणे हा देखील गुरुवारी सकाळी मुंबई आंतरराष्ट्रीय विमानतळावर दाखल झाला पण यावेळी महाराष्ट्र शासनातर्फे अजिंक्यच्या स्वागताला कोणीही उपस्थित नव्हते. एकीकडे जागतिक पातळीवर नाव उंचावणाऱ्या या मराठमोळ्या खेळाडूवर जगभरातून कौतुकाचा वर्षाव होत आहे. कायमच राजकारणात मराठीचा मुद्दा आणणाऱ्या शिवसेनेच्या सरकारची मराठी माणसाची पाठ थोपटताना मात्र सरकारी अनास्था दिसून आली. पण याउलट अजिंक्य रहाणेच्या राहत्या इमारतीत त्याचे मराठमोळ्या पद्धतीने ढोल ताशाच्या गजरात जंगी स्वागत करण्यात आले.

अजिंक्य रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने ऑस्ट्रेलियात जाऊन ऑस्ट्रेलियालाच चारीमुंड्या चीत केले. सुनील गावस्कर, कपिल देव, सौरव गांगुली, सचिन तेंडुलकर, विराट कोहली या दिग्गजांनाही न साधलेला कारनामा रहाणेच्या नेतृत्वात भारतीय संघाने करून दाखवला. ब्रिस्बेनचे मैदान ऑस्ट्रेलियन संघाचा बालेकिल्ला मानला जातो जिथे गेल्या ३२ वर्षांत ऑस्ट्रेलियन संघ कधीही कसोटी सामना हरला नव्हता. पण या गडलाही सुरुंग लावण्याचे काम रहाणेच्या नेतृत्वातील भारतीय संघाने केले. भारतीय संघाच्या या कामगिरीसाठी पंतप्रधान मोदींनीही कौतुक केले. पण अशा या संघाचे नेतृत्व करणाऱ्या रहाणेचे मुंबई विमानतळावर स्वागत करावेसे ठाकरे सरकारला वाटले नाही.

Exit mobile version