उद्धव ठाकरेंनी केला मर्द, कोथळा, अवलादचा पुनरुच्चार

उद्धव ठाकरेंनी केला मर्द, कोथळा, अवलादचा पुनरुच्चार

महाराष्ट्राचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी आज रविवार, १० एप्रिल रोजी कोल्हापूर उत्तर विधानसभा मतदारसंघाच्या पोटनिवडणुकीसाठी प्रचाराचे भाषण केले. राज्यातील कोरोनाचे सर्व निर्बंध हातून प्रचार सुरळीत झाला असला तरीदेखील कोल्हापूरला प्रत्यक्ष जाण्याचे कष्ट न घेता मुख्यमंत्र्यांनी ऑनलाईन प्रचारालाच प्राधान्य दिले. तर यावेळी देखील प्रचारात पुन्हा एकदा मर्द, कोथळा, अवलाद वगरे नेहमीच्याच त्यांच्या भाषणाची पुनरावृत्ती ते करताना दिसले.

यावेळी मुख्यमंत्र्यांनी कोल्हापूर हा भगव्याचा गड आहे असे प्रतिपादन केले. पण असे सांगत ते भगव्याला विरोध करणाऱ्या काँग्रेस पक्षाच्या उमेदवाराला मतदान करण्याचे आव्हान करत होते. यावेळी त्यांनी पुन्हा एकदा तेच तेच जुने मुद्दे मांडत भाजपावर टीका करण्याचा प्रयत्न केला. आम्हीच खरे हिंदुत्ववादी, बाळासाहेबांच्या खोलीतले वचन, मेहबूबा मुफ्ती सोबतची युती हेच मुद्दे उगाळत त्यांनी भाजपावर निशाणा साधला.

हे ही वाचा:

पत्राचाळीच्या व्यवहारातील मूळ पुरुष आणि ठाकरे कुटुंबाचा आहे जवळचा संबंध!

भारत-पाक सीमेवरील बॉर्डर व्ह्यू पॉइंटचे केंद्रीय मंत्री अमित शहांनी केले उद्घाटन

पंढरपूरमध्ये पांडुरंगाने आशीर्वाद दिला, कोल्हापूरमध्ये आई अंबाबाई देईल

‘कोल्हापूरची जागा हिंदुत्व न मानणाऱ्या काँग्रेसकडे जाऊ नये’

तर त्यांनी आपल्या भाषणात पुन्हा एकदा संजय राऊत यांनी केलेल्या आयएनएस विक्रांतच्या आरोपांची री ओढण्याचा प्रयत्न केला. आयएनएस विक्रांत या युद्धनौकेसाठीचे पैसे खाणाऱ्या दलालाला भाजपा पाठीशी घालत आहे असे मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी म्हटले. पण हे आरोप करताना या कथित घोटाळ्याचे पुरावे मुख्यमंत्र्यांनाही द्यावेसे वाटले नाहीत.

१२ एप्रिल रोजी कोल्हापूर उत्तर या जागेसाठी मतदान पार पडणार आहे. तर १६ एप्रिल रोजी या मतदानाची मतमोजणी होणार आहे. काँग्रेसने जयश्री जाधव यांना निवडणुकीच्या रिंगणात उतरवले असून त्या महाविकास आघाडीच्या अधिकृत उमेदवार असणार आहेत. तर भाजपाकडून सत्यजित कदम यांना उमेदवारी देण्यात आली आहे.

Exit mobile version