शिवसेना माझी आहे असे मी म्हणू का? उदयन राजे कडाडले

भाजपा खासदार उदयनराजे भोसले आणि कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांची आज भेट झाली. त्यानंतर उदयनराजे यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला.

शिवसेना माझी आहे असे मी म्हणू का? उदयन राजे कडाडले

भाजपा खासदार उदयनराजे भोसले आणि कॅबिनेट मंत्री दीपक केसरकर यांची आज भेट झाली. त्यानंतर उदयनराजे यांनी माध्यमांशी बोलताना उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधला. प्रत्येकालाच सत्ता हवी असते, पण आत्मचिंतन केलं असत, तर आत्मक्लेष करायची वेळ आली नसती, अशी टीका उदयनराजे भोसले यांनी केली आहे.

“शिवसेनेत बंड झालाय का? याबाबत मला काही माहिती नाही,” अशी खोचक टीका उदयनराजे यांनी केली आहे. “शिवसेना शिवाजी महाजारांच्या नावाने स्थापन केली, मग मी म्हणायचं का शिवसेना माझी आहे” असा प्रश्नही उदयनराजेंनी विचारला आहे.

“लोकशाहीत संपूर्ण महाराष्ट्र हा लोकांचा आहे. कुठल्याही पक्षाचे आमदार असो वा खासदार ते लोकांमधून निवडून जात असतात. त्यामुळे हा छत्रपतींचा महाराष्ट्र लोकांचा महाराष्ट्र आहे,” असं उदयनराजे भोसलेंनी म्हटलं आहे. “इतर राजांमध्ये आणि शिवाजी महाराजांमध्ये इतकाच फरक होता की ते स्वतःला राजा म्हणायचे नाही. मात्र, जनतेचा राजा म्हणून ओळख केवळ शिवाजी महाराजांची आहे,” असंही उदयनराजेंनी म्हटलं आहे.

हे ही वाचा:

भाजपा प्रदेशाध्यक्षपदी बावनकुळे तर मुंबईची जबाबदारी शेलारांकडे

मोदी हटाव सत्ता बचाव

…म्हणून जॉन्सन अँड जॉन्सन बेबी पावडर होणार बंद

‘जैश-ए-मोहम्मद’च्या उपप्रमुखाला काळ्या यादीत टाकण्यावर चीनची आडकाठी

राज्यातील पर्यटन स्थळांचा विकास व्हावा, महाबळेश्वरमध्ये आणखी कोणती विकासकामे करता येतील याबाबत चर्चा केल्याचेही उदयनराजे भोसले यांनी सांगितले आहे.

Exit mobile version