एकनाथ शिंदे यांच्यासोबत असलेले आमदार उदय सामंत यांच्या गाडीवर पुण्यात हल्ला झाला. या हल्ल्यात उदय सामंत यांच्या गाडीची काच फुटली. या हल्ल्यानंतर उदय सामंत यांनी अंत पाहू नका, असे प्रत्युत्तर उदय सामंत यांनी विरोधकांना दिले आहे.
मंगळवार, २ ऑगस्ट रोजी उदय सामंत यांच्या गाडीवर हल्ला करण्यात आला. उदय सामंत यांच्या गाडीवर कात्रज चौकाजवळ काही जणांनी हल्ला केला. उदय सामंत यांची गाडी दिवसभरात जिथे आदित्य ठाकरेंची जाहीर सभा होती त्याच ठिकाणाहून जात होती. त्यावेळी आदित्य ठाकरेंच्या समर्थकांनी त्यांच्या गाडीवर हल्ला केला. हल्ल्यात उदय सामंत यांच्या गाडीची काच फुटली. घटनेच्या वेळी उदय सामंत गाडीत होते मात्र ते सुरक्षित आहेत.
गद्दार म्हणता तरी शांत आहे…शिव्या घालता तरी शांत आहे..आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत आहे..लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल.. शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही..काळ ह्याला उत्तर आहे..अंत पाहू नका.. जय महाराष्ट्र 🚩🚩🚩
— Uday Samant (@samant_uday) August 2, 2022
या हल्ल्यानंतर उदय सामंत यांनी ट्विटरवर टीका केली आहे. ‘ गद्दार म्हणता तरी शांत आहे…शिव्या घालता तरी शांत आहे..आई वडिलांना शिव्या घातल्यात तरी शांत आहे..लोकशाहीत विचार बदलला म्हणून काय ठार माराल.. शांत आहे म्हणजे हतबल आणि असाह्य नाही..काळ ह्याला उत्तर आहे..अंत पाहू नका.. जय महाराष्ट्र’ असा थेट इशाराच उदय सामंत यांनी दिला आहे.
हे ही वाचा:
अविनाश भोसलेंचा ड्युप्लेक्स फ्लॅट तर छाब्रियांची जमीन जप्त
उदय सामंत हल्ल्याप्रकरणी शहर प्रमुख संजय मोरेंसह पाच जणांना अटक
राष्ट्रकुल स्पर्धेत आणखी दोन सुवर्णपदकांवर भारताची मोहोर
१००, २००च्या बनावट नोटा छापणाऱ्या चारजणांच्या गठड्या वळल्या!
दरम्यान, उदय सामंत यांच्यावरील हल्ल्याप्रकरणात पुण्याचे शिवसेना शहर प्रमुख संजय मोरे यांच्यासह पाच जणांना अटक करण्यात आली आहे. पुणे पोलिसांनी संजय मोरे यांना मंगळवारी रात्री उशिरा अटक केली. तर या प्रकरणात आणखी काही लोकांना अटक होण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.