उदय सामंत नॉट रिचेबल; गुवाहाटीला रवाना?

उदय सामंत नॉट रिचेबल; गुवाहाटीला रवाना?

शिवसेनेचे नेते एकनाथ शिंदे आणि काही आमदारांनी केलेल्या बंडानंतर शिवसेनेच्या अडचणी आणखी वाढण्याची चिन्हे आहेत. शनिवारपर्यंत शिवसेना बंडखोरांवर कारवाई करण्यासाठीच्या बैठकीत उपस्थित राहणारे राज्याचे उच्च शिक्षण मंत्री उदय सामंत हे आता नॉट रिचेबल आहेत. आज, २६ जूनच्या सकाळपासून उदय सामंत नॉट रिचेबल आहेत. त्यामुळे शिवसेनेच्या गोटात खळबळ उडाली आहे.

उदय सामंत हे काल झालेल्या शिवसेनेच्या कार्यकारणीच्या बैठकीत उपस्थित होते. त्यानंतर आज सकाळपासून ते नॉट रिचेबल आहेत. त्यानंतर आता उदय सामंतदेखील एकनाथ शिंदे यांच्या गटात सहभागी होणार असल्याच्या चर्चा आहेत. आज सकाळीच उदय सामंत सूरतला गेले आणि तिथून ते गुवाहाटीसाठी रवाना झाल्याची माहिती माध्यमांनी दिली आहे.

हे ही वाचा:

बंडखोर आमदारांच्या घराबाहेर सीआरपीएफचे कडे

… म्हणून मुख्यमंत्री योगींच्या हेलिकॉप्टरचं इमर्जन्सी लँडिंग

शिवसेनेचे ठाणे जिल्हाप्रमुख नरेश म्हस्के देणार राजीनामा

आनंद दिघेंच्या चेल्याला कोण घाबरवतंय ?

विधानपरिषदेच्या निवडणूक निकालानंतर एकनाथ शिंदे आणी काही आमदार नॉट रिचेबल होते. ते गुजरातमध्ये असल्याची माहिती मिळाली. त्यानंतर ते आसाममध्ये गुवाहाटी येथे रवाना झाले. बंड केलेल्या आमदारांवर शिवसेनेकडून टीका होत आहे. आता या बंडखोर आमदारांच्या यादीत उदय सामंत यांचेही नाव जोडले जाण्याची शक्यता आहे.

Exit mobile version