उदय सामंत, गडाख, अब्दुल सत्तार हे काय १९६६ पासूनचे शिवसैनिक आहेत का?

उदय सामंत, गडाख, अब्दुल सत्तार हे काय १९६६ पासूनचे शिवसैनिक आहेत का?

विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी आज पत्रकार परिषद घेऊन शिवसेनेवर हल्लाबोल केला. दसरा मेळाव्याला मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी भाजपावर, भाजपामध्ये उपरे जास्त झाल्याची टीका केली होती. भाजपा नेते सातत्याने ठाकरे यांच्या या वक्तव्यावर टीका करत आहेत. एकीकडे भाजपा नेत्या चित्रा वाघ यांनी ठाकरे सरकार काँग्रेस राष्ट्रवादीच्या उपऱ्यांच्या जीवावर टिकून आहे याची आठवण करून दिली तर आता प्रवीण दरेकर यांनी, “उदय सामंत, शंकरराव गडाख, अब्दुल सत्तार हे काय १९६६ पासूनचे शिवसैनिक आहेत काय?” असा सवाल केला आहे.

“तुमच्या पक्षातील उपऱ्यांची संख्या आणि भाजपमधील उपऱ्यांची संख्या एकदा जनते समोर येऊ द्या, आजच्या तुमच्या मंत्रिमंडळात कोण आहेत? उदय सामंत, शंकरराव गडाख, अब्दुल सत्तार हे काय १९६६ पासूनचे शिवसैनिक आहेत का? प्रियंका चतुर्वेदी या पदर खोचून आंदोलनात उतरणाऱ्या रणरागिणी आहेत का? उर्मिला मातोंडकर कोण आहेत? या लोकांनी कंबर कसून शिवसेनेसाठी आंदोलने केली आहेत का? मग इतरांना उपरे म्हणणं कितपत योग्य आहे? असा सवाल दरेकर यांनी केला आहे.

हे ही वाचा:

काँग्रेसच्या बैठकीत सरदार पटेल यांचा पुन्हा अपमान

काय आहे इस्रायमधल्या ‘मायबोली’ मराठी मासिकाची कथा?

ठाकरे सरकार म्हणजे, ‘अलीबाबा आणि चाळीस चोर’

हिंदू राष्ट्र मजबूत करण्यासाठी राज ठाकरे जाणार अयोध्येला

राज्यात सध्या अत्यंत खालच्या पातळीवरची टीका सुरू आहे. आमचे नेते गांजा घेतात की काय असं बोललं जात आहे. ड्रग्ज, गांजा याची बाजू कोण घेतं हे महाराष्ट्रातील जनतेला नीट माहीत आहे. सुशांतच्या प्रकरणात काय झालं हे सर्वांना माहीत आहे. ते काढायला भाग पाडू नका. कुणाच्या जावयाला ड्रग्ज प्रकरणी अटक झाली आहे, हेही सर्वांना माहीत आहे. कोण गांजा, ड्रग्जची पाठराखण करतं हे सर्वांना माहीत आहे. अशी जहरी टिकाही दरेकर यांनी केली.

Exit mobile version