29 C
Mumbai
Saturday, November 16, 2024
घरराजकारणउदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंचे आरोप ठरविले खोटे

उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंचे आरोप ठरविले खोटे

उद्योग महाराष्ट्राबाहेर चालले असल्याचे केले होते आरोप

Google News Follow

Related

गेले काही दिवस महाराष्ट्रातून कसे उद्योग परराज्यात गेले याविषयी आदित्य ठाकरे पत्रकार परिषदांमधून आरोप करत आहेत. त्यावरून राज्याचे उद्योगमंत्री उदय सामंत यांनी आदित्य ठाकरेंच्या आरोपांना उत्तरे दिली आणि त्यांचे आरोप खोटे ठरविले.

उदय सामंत म्हणाले की, सिनार मासच्या संदर्भात जो एमओयू झाला तो दावोसला झाला. त्याबद्दल दुमत नाही. पण एमओयू झाला म्हणजे इंडस्ट्री आली, रोजगार मिळाले असे होत नाही. काल जमीन वितरण आणि ऑफर लेटर दिलेले आहे. मुख्यमंत्री उपमुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन गैरसमज पसरवला जातो.

उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनीअनिल अगरवाल यांची भेट घेतली ती प्रकल्प महाराष्ट्राबाहेर जाण्यासाठी असा आरोप आदित्य ठाकरे यांनी केला होता. त्यावर उदय सामंत म्हणाले की, पत्र आहे माझ्याकडे. १४ जुलै २०२२ ला की महाराष्ट्र पुणे किंवा महाराष्ट्रातील परिसर उद्योगासाठी अनुकूल आहे म्हणून त्यांनी आम्हाला बैठक द्यावी असे वेदांता फॉक्सकॉनला लिहिले होते. एखाद्या कंपनीला एमओयू करायला सांगणं यात वावगं काही नाही. २४ मे २०२२ रोजी दावोसला बैठक झाली. पण त्याचे मिनिटस नाहीत. जूनमध्ये दिल्लीत बैठक झाली त्याचे मिनिट्स नाहीत. एकनाथ शिंदे देवेंद् फडणवीस यांची हायपॉवर कमिटी झाली १४ जुलैला पत्र लिहिलं आणि १५ जुलैला हायपॉवर कमिटीची बैठक झाली. त्यानंतर मुख्यमंत्र्यांनी दोनदा पत्र लिहिलं. महाराष्ट्रात येऊन प्रकल्प चालू करावा, असे आवाहन करण्यात आले. एखाद्या प्रकल्पाला चालू करण्यास सांगणं म्हणजे एमओयू झाला असे सांगणे योग्य नाही. वेदांता फॉक्सकॉनच्या बाबतीत एमओयू झालेला नव्हता. साधी सही झालेली नाही. एमआयडीसीत रेकॉर्ड नाही. सिनार मासचा प्रकल्प जाणार होता तो थांबला त्यासाठी या सगळ्या पत्रकार परिषदा चालल्या आहेत. अजून एक आकडेवारी सांगतो. एमओयू झाले. वाजतगाजत सांगण्यात आले. नक्की किती झाले. ३० हजार ४९८ कोटींचे करार झाले. त्यात १३६२५ स्थानिक होते. एफडीआयचे १६८७३ होते. त्याच्यातला १०५०० कोटींचा सिनार मासचा होता.

हे ही वाचा:

वाहन उद्योगातील दिग्गज विक्रम किर्लोस्कर यांचे निधन

पालघर-डहाणूमध्ये ड्रोन्सचा विनापरवाना वापर वाढला

मुंबई-पुणे महामार्गावर कंटेनर १०० फूट खोल दरीत कोसळला

अदानी करणार आशियातील सर्वात मोठ्या धारावी झोपडपट्टीचा पुनर्विकास

 

उदय सामंत यांनी विश्वास व्यक्त केला की, लवकरच तुम्हाला दीडपट एमओयू झालेले दिसतील. इंडस्ट्रीच्या संपर्कात आहोत. जर्मनचे राजदूतांना भेटलो. त्यांनाही आश्चर्य वाटले मंत्रालय सोडून मंत्री पुण्यात आले याचे. महाराष्ट्राच्या अधिकाऱ्यांना त्यांनी निमंत्रण दिले आहे. उदय सामंत म्हणाले, साडेतीन चार महिन्यात प्रकल्प गेले असा टाहो काहीजण नाहक करत आहेत. त्याच्याकडे दुर्लक्ष करून याची माहिती घेण्यासाठी दोन माजी सनदी अधिकारी, न्यायमूर्तींच्या अध्यक्षतेखाली एक समिती तयार केली जाईल. ६० दिवसांत प्रकल्प कसे गेले, कधी गेले, त्यांनी कधी एमओयू केलेले होते. बैठका कधी झाल्या, मिनिट्स कुठे आहेत ही माहिती घेतली जाईल.मागे मी म्हटले होते की श्वेतपत्रिका काढू तेही आम्ही करत आहोत.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
191,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा