31 C
Mumbai
Tuesday, November 5, 2024
घरराजकारणप्रशासनाने मनमानी करून कार्यक्रम केलेला नाही!

प्रशासनाने मनमानी करून कार्यक्रम केलेला नाही!

आरोग्यमंत्री उदय सामंत यांनी दिले स्पष्टीकरण

Google News Follow

Related

महाराष्ट्र भूषण कार्यक्रमाच्या निमित्ताने लाखो श्री सदस्य खारघरमध्ये गोळा झाले होते पण उष्माघातामुळे त्यातील १३ जणांना आपले प्राण गमवावे लागले. त्यावरून राज्य सरकार टीकेचे लक्ष्य बनले असताना आरोग्यमंत्री उदय सामंत यांनी या संदर्भात राजकारण न करता सरकारला मदत करण्याचे, सूचना करण्याचे काम करावे अशी विनंती केली आहे. तसेच या कार्यक्रमाचे आयोजन मनमानी करून केलेले नाही. समन्वय राखूनच सगळ्या गोष्टी झाल्या आहेत, असेही सामंत म्हणाले.

पत्रकार परिषद घेऊन त्यांनी सरकारची भूमिका मांडली. ते म्हणाले की, मला वाटते की श्री सदस्यांना जास्त सुविधा देण्याचा प्रयत्न करण्यात आला. पण दोन दिवसांत वातावरण बदलले. तापमान ३४ पर्यंत पोहोचले. आप्पांना बघता यावे म्हणून अनेक श्री सदस्य १४ तारखेला आले होते. १५ तारखेलाही लोक आले. ज्या आस्थेने ती आली. त्यांना थांबवणे योग्य नव्हते. सगळ्यांना एकत्र येऊन नियोजन केले होते.

सामंत यांनी सुविधांबद्दलही सांगितले. ते म्हणाले की, वैद्यकीय सुविधांमध्ये ब्लड बँक, प्राथमिक उपचार यंत्रणा सज्ज होती. कालचा प्रकार दुर्दैवी आहे. ज्या संख्येने श्री सदस्य जमले त्या श्री सदस्यांना पाण्यापासून वैद्यकीय उपाययोजना प्रशासनामार्फत, श्रीसदस्यांच्या मार्फत करण्यात आल्या होत्या. पण दुर्दैवी घटना उष्माघातामुळे घडली. ज्या पद्धतीने कार्यक्रम झाला. २०-२२ लाख सदस्य होते. कुठेही प्रशासनाने हुकुमशाही करून कार्यक्रम केलेला नाही. सर्वांची चर्चा करून कार्यक्रम केला. यातही राजकारण करणारे राजकारणी महाराष्ट्रात आहेत हे दुर्दैव. महाराष्ट्र सरकारने आप्पासाहेबांसारख्या सामाजिक क्षेत्रात काम करणाऱ्या व्यक्तीला हा पुरस्कार दिला होता. त्यांना बघायला, ऐकायला लाखो लोकं आली होती. सगळ्यांनी एकत्र यायला हवे असा हा प्रसंग आहे. राजकीय भांडवल करण्यापेक्षा मोठ्या मनाने कार्यक्रमाचा विचार केला पाहिजे. एककलमी टीका करण्यापेक्षा याबद्दलच्या सूचना सरकारल्या द्याव्यात.

 

हे ही वाचा:

मुंबई विमानतळावर जप्त केले १६ कोटी रुपयांचे हेरॉईन

श्रीराम मंदिरासाठी १ कोटी देणारे महंत कनक बिहारी दासजी महाराज यांचे अपघाती निधन

दिलासा नाहीच मनीष सिसोदिया यांचा मुक्काम तुरुंगातच

बीबीसीला अतीक अहमदबद्दल सहानुभूती, ठरवले रॉबिनहूड

उदय सामंत म्हणाले की, मुख्यमंत्र्यांनी स्वतः चारवेळा संपूर्ण कार्यक्रमाचा आढावा घेतला होता. कालची दुर्घटना दुर्दैवी आहे. जखमींचा खर्च महाराष्ट्र शासन करणार आहे. राजकीय भांडवल करू नये. त्यासाठी भरपूर मैदाने शिल्लक आहेत. खर्च किती झाला, कशासाठी झाला हे जाहीर करू. ३८० एकरचे मैदान होते. अनेक लोक याचा राजकीय फायदा घेऊ इच्छितात. राज ठाकरेंनी काही सूचना केल्या आहेत याचे पालन भविष्यात करता येईल असा प्रयत्न करू.

spot_img

लेखकाकडून अधिक

प्रतिक्रिया द्या

कृपया आपली टिप्पणी द्या!
कृपया येथे आपले नाव प्रविष्ट करा

The reCAPTCHA verification period has expired. Please reload the page.

आम्हाला follow करा

49,899चाहतेआवड दर्शवा
2,036अनुयायीअनुकरण करा
187,000सदस्य यादीसदस्य व्हा

इतर नवीनतम कथा